पुणे

पिंपोडे बुद्रुक रात्रीस खेळ चाले

CD

पिंपोड्यात खडी वाहतूक ‘सुसाट’

महसूलसह पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष; रात्री होतेय नियमांची पायमल्ली

पिंपोडे बुद्रुक, ता. ८ : येथे खडी क्रशर व डंपर चालकांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, रात्रीच्या वेळी नियमांची पायमल्ली करत बेधडक वाहतूक सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या गंभीर प्रकाराकडे महसूल आणि पोलिस प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रात्रीच्या वेळी डंपर वाहतुकीमुळे ग्रामस्थांची झोप उडाली आहे. रात्रभर खडी क्रशरची घरघर सुरूच असते. तेथून ओव्हरलोड खडी आणि क्रशर सँड घेऊन जाणारे डंपर वेगाच्या सर्व मर्यादा ओलांडून धावत आहेत. अनेक डंपरला ना नंबर प्लेट आहे, ना त्यांच्याकडे वाहतुकीचे रीतसर परवाने. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हे चालक विनापरवाना गौण खनिजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी करत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. या जड वाहतुकीमुळे उत्तर कोरेगाव भागातील रस्त्यांची पार चाळण झाली आहे. त्यात सोनके- वाघोली, पिंपोडे- सोळशी तसेच वाई-वाठार आणि देऊर रस्त्यांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले असून, मोठे खड्डे पडले आहेत. डंपरवर ताडपत्री न झाकताच खडीची वाहतूक केली जात असल्याने रस्त्यावरून चालणाऱ्या दुचाकीस्वारांच्या डोळ्यांत धूळ आणि खडी उडून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या या गोंधळामुळे स्थानिक रहिवासी व प्रवाशांची झोप उडाली आहे. रस्त्यांची होणारी दुरवस्था आणि अपघातांचे वाढते सावट पाहता प्रशासनाने तत्काळ भरारी पथके नेमून रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, तसेच नियम तोडणाऱ्या डंपर मालकांवर आणि क्रशर चालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अवैध वाहतूक थांबली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

-- चौकट -
प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ मौन?
महसूल विभाग आणि आरटीओ प्रशासनाने या नियमबाह्य वाहतुकीवर लगाम लावणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. ‘रात्रीस खेळ चाले’ या उक्तीप्रमाणे रात्रीच्या वेळी होणाऱ्या या हालचाली प्रशासनाला दिसत नाहीत की पाहून दुर्लक्ष केले जाते? असा सवाल आता सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. या बेकायदेशीर वाहतुकीमागे मोठे आर्थिक धागेदोरे असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

-- कोट--
हा गंभीर प्रकार असून, याबाबत सर्वांना ताकीद देण्यात येईल. नियमबाह्य खडी उपसा करणारे क्रशर व वाहतूक करणारे डंपर आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-राहुल नाळे, गावकामगार तलाठी, पिंपोडे बुद्रुक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: 11 हजारांनी घसरल्यानंतर सोन्याने घेतला U-Turn! ग्राहकांना मोठा झटका? जाणून घ्या आजचा ताजा भाव

Anna Hazare Praises Tukaram Mundhe : "अशा डॅशिंग अधिकाऱ्यांची देशाला गरज"; तुकाराम मुंढेंच्या 'त्या' धडक मोहिमेवर अण्णा हजारे खूश, केलं तोंडभरुन कौतुक

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्याकांत प्रकरणात सियाच्या दोन मैत्रीणींकडेही चौकशी होणार

सरकारी रुग्णालयात प्रसुती झाल्यास मिळणार सोन्याची अंगठी, राज्य सरकारचा मोठा निर्णय...

TrashBot : बारावीच्या विद्यार्थिनीने बनवला अद्भुत 'ट्रॅशबॉट' रोबो; कचरा बघताच पळत जाऊन करतोय साफसफाई, पाहून तुमचं डोकं चक्रावेल

SCROLL FOR NEXT