पुणे

चंद्रपूर

CD

साठ हजार रुपयांचे अवैध
एचटीबीटी बियाणे जप्त
----
गोंडपिपरी पोलिस आणि कृषी विभागाची संयुक्त कारवाई
----
सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर : खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांनी पूर्वतयारी सुरू केली आहे. अशातच राज्यात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी बियाणे तस्कर सक्रिय झाले आहेत. एचटीबीटीचा मोठा साठा तस्करांकडून वाहतूक करताना दोघांना पकडण्यात असून त्यांच्याकडून साठ हजार रुपये किमतीचे बियाणे जप्त करण्यात आले आहे.
वढोली-विठ्ठलवाडा मार्गावर मंगळवारी (ता. १२) पोलिस आणि कृषी विभागाने ही संयुक्त कारवाई केली.कृषी विभागाकडून वारंवार जनजागृती करूनही अवैध एचटीबीटी बियाण्याची राज्यात तस्करी सुरू आहे. याचाच फायदा घेत तस्करांनी मोठे जाळे तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या गोंडपिपरी तालुक्यात विणले आहे. गावागावांत अवैध एचटीबीटी विकणाऱ्यांची मोठी फौज निर्माण झाली आहे. अशात या चोरट्यांना रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.
वढोली-विठ्ठलवाडा मार्गावरून चोरबीटी बियाण्यांची तस्करी होत असल्याची माहिती यंत्रणेला मिळाली. या माहितीनंतर गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे, तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे, कृषी अधिकारी जी. बी. पाटील यांनी या प्रकरणी शहानिशा करण्यासाठी घटनास्थळ गाठले. दरम्यान मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. काही वेळातच एक संशयित दुचाकी वाहनाची तपासणी केली असता या वाहनात ४५० ग्रॅम वजनाचे ६० पॅकेट आढळून आले. याची किंमत ६० हजार रुपये असून बियाणे व दुचाकी असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी तस्करी करणारे राजेंद्र खुशाबराव ठेंगणे, नांदगाव व प्रकाश यादव ताजने, राजुरा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई ठाणेदार रमेश हत्तीगोटे, तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे, कृषी अधिकारी जी. बी. पाटील, वंदीराम पाल, तिरुपती गोडसेलवार, प्रवीण कडुकर यांनी केली आहे.

कोट ----
अवैध एचटीबीटी बियाणे हे शेतीसाठी मारक आहे. या बियाण्यामुळे जास्त उत्पन्न होते, हा मोठा गैरसमज आहे. अनेक सुज्ञ शेतकऱ्यांनी या बियाण्यांचा वापर करणे बंद केले आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी या बियाण्याचा वापर टाळावा.
- सचिन पानसरे,
तालुका कृषी अधिकारी, गोंडपिपरी

कोट ----
तस्करांना सोडणार नाही
तेलंगणातून सीमेवरील गोंडपिपरी तालुक्यात अवैध एचटीबीटी बियाणे तस्करी केली जाते. अशा पद्धतीने तस्करी करणाऱ्यांवर आमची करडी नजर आहे. या बाबत काही माहिती असल्यास शेतकरी बांधवांनी आम्हाला माहिती द्यावी, असे आवाहन गोंडपिपरीच्या पोलिस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Hospital Bomb Scare : पुणे-हडपसर बॉम्बसदृश प्रकरण : संशयित आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात, 'आरोग्य विभागा'शी काय आहे कनेक्शन?

VD Satheesan Kerala CM : केरळला नवे नेतृत्व; काँग्रेसकडून व्ही. डी. सथीसन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती

ChatGPT ने एका रात्रीत बनवून टाकलं करोडपती! केली 631 अब्ज रुपयांची कमाई, काय होती ट्रिक? पाहा

IPL 2026: विकेट तर गेलीच, पण सोन्याची चैनही पडली! RCB च्या ओपनरसोबत घडला अजब प्रकार अन् मग पडिक्कलने दाखवलं वेळेचं भान

ACB Bribe Arrest : पुण्यानंतर आता नवी मुंबईत 'एसीबी'चा मोठा दणका; सिडकोचे अप्पर जिल्हाधिकारी 22 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत

SCROLL FOR NEXT