कानगाव, ता. १० : दौंड तालुक्यातील कानगाव परिसरात पोलिसांनी (ता. २) अवैध हातभट्टी दारूनिर्मिती आणि विक्रीवर छापा टाकून मुद्देमाल जप्त केला होता. मात्र, या कारवाईला आठवडा उलटत नाही तोच, ज्या ठिकाणी कारवाई झाली होती, त्याच ठिकाणी पुन्हा अवैध दारू विक्री सुरू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. यामुळे पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांच्या छाप्यामुळे परिसरातील अवैध व्यावसायिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, अवघ्या काही दिवसांतच व्यवसाय पूर्ववत सुरू झाल्याने ही कारवाई केवळ एक फार्स ठरला असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. केवळ मुद्देमाल जप्त करण्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता, या अवैध व्यवसायाचा मूळ स्रोत शोधून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
यापूर्वीही अशा कारवाया झाल्या आहेत, मात्र काही दिवसांतच परिस्थिती ‘जैसे थे’ होते. त्यामुळे कारवाई केलेल्या ठिकाणांवर पोलिसांनी नियमित देखरेख ठेवावी, जेणेकरून अवैध व्यावसायिकांना पुन्हा संधी मिळणार नाही, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
अवैध धंद्यांवरती छापे टाकण्याचे काम सुरूच आहे. त्याच ठिकाणी परत धंदे सुरू होत असतील तर त्याच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल.
- संतोष तासगावकर, पोलिस निरीक्षक, यवत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.