सासवड, ता. २४ : सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हरणी गावात अवैध मद्य विक्री करणाऱ्या एकावर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी शंकर रघुनाथ यादव (रा. हरणी, ता. पुरंदर) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (ता. २४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हरणी- वाल्हे मार्गावरील एका शेडमध्ये शंकर यादव हा विनापरवाना विदेशी दारू विकत होता. दरम्यान, माहिती मिळताच पोलिस हवालदार संदीप पवार व त्यांच्या पथकाने छापा टाकून आरोपीच्या ताब्यातून ९६० रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.