इंटरनेट केबल sakal
पुणे

स्ट्रीट लाईट खांबावर बेकायदेशीररित्या इंटरनेट केबल ओढण्याचे काम सुरू

परिसरातील रस्ते, इमारती यांचे विद्रुपीकरण; केबलची जाळे तयार झाल्याने पक्ष्यांना त्रास

सकाळ वृत्तसेवा

धनकवडी : धनकवडीमध्ये रस्त्याच्या बाजूने उभे असलेल्या स्ट्रीट लाईट खांबावर बेकायदेशीररित्या खाजगी इंटरनेट प्रोव्हायडर यांचे केबल ओढण्याचे काम सुरू असताना. महानगरपालिकेच्या तीन स्ट्रीट लाईट खांबावर अतिताण आल्यामुळे हे खांब मुळासकट तुटून रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकीस्वार महिलेच्या अंगावर खांब कोसळल्याने यामध्ये दुचाकीस्वार एक महिला व एक अल्पवयीन मुलगी थोडक्यात बजावून या अपघातात जखमी झाली. यामध्ये जखमी झालेल्या महिला विनिता अभिजीत काळे, वय 25,रा.आंबेगाव, व दुर्वा जितू भालेराव, वय 12,रा.तळजाई पठार त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे.

आज दुपारच्या सुमारास धनकवडी येथील स्व.शिवाजीराव आहेर पाटील चौकाकडून त्रिमूर्ती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जय भवानी मंदिराजवळील वळणावर अज्ञात खाजगी इंटरनेट प्रोव्हायडर यांची इंटरनेटची केबल ओढण्याचे काम तीन ते चार कामगार यावेळी करत होते.

एकावेळी महानगरपालिकेचे 9 मीटर उंचीचे व 80 ते 90 किलो चे एक असे, तीन स्ट्रीट लाईट खांब एका झटक्यात मध्ये कोसळले. यातील एक स्ट्रीटलाइट खांब रस्त्यावरील दुचाकीस्वार महिले वर पडला. ही महिला धनकवडी कडून आंबेगाव पठार परिसरात चालली होती. खांब खांद्यावर पडून त्याची वायर गळ्याला घासल्याने मोठी जखम गळ्याला झाली. यावेळी जखमी महिला व मुलीला परिसरातील नगरसेवक किशोर धनकवडे व सामाजिक कार्यकर्ते सागर भागवत यांनी तात्काळ प्रथम उपचाराकरिता हॉस्पिटलला पाठविण्यास मदत केली.

मुळात स्ट्रीट लाईट खांबावरून कोणत्याही प्रकारची केबल नेण्यास बंदी असताना देखील या खांबांवरऊन बेकायदेशीररीत्या, विना परवानगी या परिसरामध्ये खाजगी इंटरनेट पुरवठादार अशाप्रकारे केबल नेण्याचे काम सर्रास या परिसरामध्ये सुरू असून, यामुळे परिसरातील रस्ते, इमारती यांचे विद्रुपीकरण व केबलची जाळे तयार झाल्याने पक्ष्यांना ही याचा त्रास होत आहे. नागरिकांना मार्फत अशा इंटरनेट केबल धारक कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी यावेळी केली.

सहकारनगर पोलिस ठाणेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक वीरेंद्र चव्हाण म्हणाले, धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्युत विभागाच्यातर्फे अज्ञात इंटरनेट केबल प्रोव्हायडर विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. अपघातानंतर घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात इंटरनेट केबल प्रोव्हायडर विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच स्थानिक केबल चालकांची चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT