पुणे

ग्राहक मंचात सुविधांचा अभाव;व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नसल्याने कामकाजावर परिणाम 

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील सर्वच न्यायालयांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) सुनावणी सुरू आहे. मात्र, येथील ग्राहक मंचात ही सुविधाच नाही. त्याचा कामकाजास फटका बसत आहे. दाव्यांच्या सुनावणीसाठी चार महिन्यानंतरच्या तारखा दिल्या आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा व अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाचे कामकाज नवीन प्रशासकीय इमारतीत चालते. तेथे सुमारे दोन हजार दावे प्रलंबित आहेत. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ नुसार दावा दाखल केल्यापासून नव्वद दिवसांत ग्राहकाला न्याय मिळणे अपेक्षित आहे. मात्र, लॉकडाउनमुळे दीड महिन्यापासून तत्काळ दावे वगळता मंचाचे कामकाज ठप्प आहे. जागा अपुरी आणि त्यातील सुविधांचा विचार करता तेथे सुनावणी घेणे धोक्याचे ठरत आहे. साथीचा संसर्ग होऊ नये, यासाठी व्हीसीद्वारे सुनावणी सोयीचे ठरले असते. मात्र ती सुविधा उपलब्ध नसल्याने ग्राहकांना न्याय मिळण्यास उशीर होत आहे. 

मंचाचे कामकाज अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या अखत्यारित येते. मंचाचे अधिकारी, कर्मचारी आणि तक्रारदार यांच्या आरोग्याचा विचार करता याठिकाणी त्वरित व्हिसीची सुविधा द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 


छोट्याशा कोर्ट हॉलमध्ये कामकाज 

मंचाच्या कार्यालयाची जागा तक्रारींचा विचार करता कमी पडत आहे. त्यामुळे अगदी छोट्याश्या खोलीत कोर्ट हॉल उभारला आहे. अगदी पाच लोक सुनावणीसाठी आले तर सामाजिक अंतर राहणे मुश्कील आहे. असेच चित्र दोन्ही मंचाच्या कार्यालयात पाहायला मिळते. 


ई कमिटीने लक्ष घालावे 

न्यायालयाचे कामकाज अत्याधुनिक पद्धतीने कसे चालवता येईल? यासाठी सर्वोच्च न्यायालयात ई कमिटी स्थापन केली आहे. त्या माध्यमातून तालुका पातळीपासून सर्व प्राधिकरणात व्हीसीद्वारे सुनावणी घेण्यात येते. कमिटीने मंचाच्या कामात आधुनिकता कशी आणता येईल, या अनुषंगाने विचार करने गरजेचे आहे. 


मंचात दाखल होणाऱ्या व प्रलंबित दाव्यांचा संख्या मोठी आहे. ग्राहकांची सुरक्षा आणि कामकाजाला गती देण्यासाठी कामकाज अद्ययावत पद्धतीने होणे गरजेचे आहे. त्यासाठी पाठपुरावा मंचातर्फे केला जाणार आहे. सध्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा वकिलांची माहिती घेत आहे. त्याआधारे ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा विचार आहे. त्यानुसार ग्राहक मंचाच्या वकील संघटनांनी प्रयत्न करावेत 

-उमेश जावळीकर, अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT