MPSC sakal
पुणे

आरोग्य विभागातील रिक्त पदे एमपीएससीमार्फत भरणे अशक्य

मोठ्या पदांसाठीच्या सगळ्या परीक्षा एमपीएससीमार्फत घेणे अवघड

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरणे अशक्य आहे. कारण एवढ्या मोठ्या पदांसाठीच्या सगळ्या परीक्षा एमपीएससीमार्फत घेणे अवघड आहे. परत आरोग्य विभागातील भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणातील दोषी व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल. ही कारवाई एवढी कडक असेल की, परत कोणी असे पेपर फोडण्याचे धाडस करणार नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.१०) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्यासाठीचे चांगले नियोजन केले होते. राज्य सरकारने याबाबत घेतलेले निर्णय स्वीकारले पाहिजेत. पण काहींनी या निर्णयांना फाटा देत चुकीचे कामे करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याच्या चुका असतील, त्याच्यावर कारवाई केली जाईल. एवढी कडक कारवाई केली जाईल की, परत कोणी असं करण्याची हिंमत करणार नाही, असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात एका बैठकीत आढावा घेतला. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, "पेपरफुटी प्रकरणामुळे ही परीक्षा रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे. मात्र याबाबत सर्व बाबींचा विचार करून आणि या संबंधित सर्व घटकांशी चर्चा करुन मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय घेतला जाईल. हा निर्णय राज्यस्तरावरचा असेल. हा निर्णय घेताना परीक्षार्थी उमेदवारांचे नुकसान होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT