in 328 school build new classroom 75 crore fund distributed pune
in 328 school build new classroom 75 crore fund distributed pune sakal
पुणे

पुणे : ३२८ आदर्श शाळांमध्ये बांधण्यात येणार नवीन वर्ग खोल्या

- मीनाक्षी गुरव

पुणे : राज्यातील आदर्श शाळा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात निवडलेल्या ४८८ शाळांपैकी ३२८ शाळांमध्ये नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम केले जाणार आहे. या बांधकामासाठी राज्य शासनाने ७५.२४ कोटी रुपयांचा निधी पहिल्या हप्ता म्हणून वितरित केला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत आपल्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर अकौंऊटवरून माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे या आदेशाचा अध्यादेशही काढण्यात आला आहे.

राज्यातील शासकीय शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास साधता यावा, तसेच सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी आदर्श शाळांची निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात ४८८ शासकीय शाळा ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित केल्या जात आहेत. त्यातील ३२८ शाळांमध्ये आता नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम केले जाणार आहे. यामध्ये प्राथमिक आणि उच्च प्राथमिकच्या २६७ शाळा, तर माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या ६१ शाळांमध्ये बांधकाम केले जाणार आहे. या शाळांच्या मोठ्या बांधकामांसाठी एकूण अर्थसंकल्पित तरतुदीच्या ३० टक्के निधी खर्च करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार कामाला चालना देण्यासाठी शिक्षण विभागाने हा निधी पहिला हप्ता म्हणून वितरित केला आहे. निधी खर्च करण्यासाठी शिक्षण आयुक्त यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित केले आहे. बांधकामावरील खर्चाचा वेळोवेळी आढावा शिक्षण आयुक्तांनी घ्यावा, असे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी याच प्रकल्पांतर्गत ३५५ शाळांमध्ये दुरुस्ती, लहान बांधकामासाठी ५३.९७ कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता. विद्यार्थ्यांना प्रगत आणि उत्तम शिक्षण मिळावे, प्रत्येक शालेय वर्गात शिक्षणासाठी उत्तम पोषक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि या शाळांच्या पायाभूत सुविधा विकासाकरिता नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम त्वरित करून घ्यावे, अशा सूचना वर्षा गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बांधकाम करण्यात येणाऱ्या काही जिल्ह्यांमधील आदर्श शाळांची संख्या

प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा :

जिल्हा : शाळांची संख्या

  • नगर : १६

  • कोल्हापूर : १२

  • पुणे : १५

  • सातारा : २३

  • नागपूर : १४

  • नाशिक : ४

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा

जिल्हा : शाळांची संख्या

  • पुणे : २

  • नागपूर : ३

  • नंदूरबार : ७

  • परभणी : ८

  • नांदेड : ६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT