Tanaji Sawant Sakal
पुणे

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर आम्ही पळ काढत नाही पण पत्रकारांनी आगीत तेल ओतू नये: तानाजी सावंत

शिवसेना शिंदे गटाच्या कोअर कमिटीसह भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील वरिष्ठ नेते एकत्रित येऊन बैठक घेतील आणि त्यासंदर्भात चर्चा करतील.

- मीनाक्षी गुरव

पुणे : ‘‘मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवर आम्ही पळ काढत नाही. जे चालले आहे, ते तुम्हीही बघत आहात. मराठा आरक्षणाबाबत जे चालले आहे, त्यात पत्रकारांनी आगीत तेल ओतायचे काम करू नये,’’ असा ठणकावून सांगत राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी अप्रत्यक्षरीत्या पत्रकारांचा रोष ओढवून घेतला.

पुण्यात विविध संस्थांच्या वतीने आयोजित ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक’ पुरस्कार वितरण सोहळ्यात सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सावंत यांनी आपला रोष व्यक्त केला. आगामी निवडणूका आणि उमेदवारी वाटपाच्या हालचालींबद्दल सावंत म्हणाले, ‘‘मार्च- एप्रिल २०२४ मध्ये निवडणूक होणार आहे. प्रत्येकजण आपापल्या पक्षाची जागा मागण्याचा प्रयत्न करत आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या कोअर कमिटीसह भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील वरिष्ठ नेते एकत्रित येऊन बैठक घेतील आणि त्यासंदर्भात चर्चा करतील. सर्वांचे समाधान करणारे त्या-त्या विभागाचे उमेदवारी वाटप हाती घेतले जाईल. सध्या प्राथमिक चर्चा सुरू आहे.’’

ससून रुग्णालयातील प्रश्नांबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही सावंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT