पुणे

पाणबुड्यांची फत्तेशिकस्त; पुण्यात ४० वर्षांपूर्वीची जलवाहिनी दुरुस्त

४१० मीटर लांबीपर्यंत काम; तब्बल १० वर्षांनंतर झाली जलवाहिनी दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सुमारे ४० वर्षांपूर्वीच्या जलवाहिनीत सात पाणबुडे उतरवून त्यातील ९८ जोड सिमेंटने जोडण्याचे अवघड काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दोन दिवसांपूर्वी यशस्वीरीत्या पूर्ण केले. पाणबुड्यांच्या मदतीने जलवाहिनी दुरुस्ती करण्याचे काम शहरात १० वर्षांनंतर झाले. या कामामुळे सुमारे अडीच लाख नळजोडांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला.

पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून शहरातील पूर्व भाग आणि पेठांना पाणीपुरवठा करणारी सुमारे तीन फूट व्यासाची जलवाहिनी आहे. जुनी असल्यामुळे तिच्यात वारंवार गळती होत असे. या जलवाहिनीवर मोठा भाग अवलंबून असल्यामुळे पाणीपुरवठा थांबवून ती दुरुस्त करण्यावर मर्यादा येत होती. गळतीमुळे पाणीही वाया जात होते अन पुरेसा दाबही मिळत नव्हता. ही दुरुस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने अखेर गुरुवारचा दिवस निवडला. कारण त्या दिवशी पाणीपुरवठा बंद असतो. हे काम मार्गी लावण्यासाठी आठ अधिकारी आणि या प्रकारच्या कामांचा अनुभव असलेले सात पाणबुडे यांची टीम निश्चित करण्यात आली. दोन दिवस त्यांच्या बैठका घेऊन कामाचे स्वरूप समजविण्यात आले.

-गुरुवारी सकाळी साडेदहाला मोहीम सुरू

-मित्रमंडळ चौक ते पर्वती केंद्रापर्यंत काम

-एकूण लांबी ४१० मीटर; जलवाहिनीचा व्यास तीन फूट

-जलवाहिनीत सात पाणबुडे उतरले

-प्रत्येकाच्या पाठीवर ऑक्सिजनचे सिलिंडर

-एका दोरीने त्यांना कनेक्ट करण्यात आले

- प्रत्येकाच्या हातात टॉर्च

-जलवाहिनीला ९८ जोडांना विशिष्ट प्रकारच्या सिमेंटचा गिलावा

-९० किलो सिमेंटचा वापर

पुरेशा दाबाने पाणीपुरवठा

जलवाहिनीत उतरलेल्या पाणबुड्यांशी विशिष्ट अंतरावर बाहेरून जलवाहिनीवर थांबलेले अधिकारी संवाद साधत होते. सायंकाळी सहाच्या सुमारास काम पूर्ण झाले. दुसऱ्या दिवशी झालेल्या कामाची चाचणी घेण्यात आली. जलवाहिनीतील गळती पूर्ण थांबलेली दिसून आली अन् पाण्याचा दाबही वाढला होता. त्यामुळे लोहियानगर, भवानी पेठ, क्वार्टर गेट आणि मधल्या पेठांचा पाणीपुरवठा पुरेशा दाबाने सुरळीत झाल्याचे दिसून आले. कार्यकारी अभियंता आशिष जाधव, उपअभियंता किसन दगडखैर, सतीश जाधव यांचा या कामात सहभाग होता.

''ही शहरातील महत्त्वाची जलवाहिनी आहे. दहा वर्षांपूर्वी याच जलवाहिनीत पाणबुडे उतरवून तिची दुरुस्ती करण्यात आली होती; परंतु आता पुन्हा दुरुस्ती करण्याची वेळ आल्यामुळे पुरेशी काळजी घेऊन काम पूर्ण करण्यात आले. आमच्या दृष्टिने हे अवघड काम होते. वेळेत आणि व्यवस्थितरीत्या ते पूर्ण झाल्याचे समाधान आहे.''

-अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT