Pune News  sakal
पुणे

Pune News : वळीवाच्या पहिल्याच पावसात सांगवी परिसरात तुंबले पाणी

जुनी सांगवी परिसरात शुक्रवार ता.१० दुपारी चारच्या सुमारास मेघगर्जनेसह आलेल्या अवकाळी पावसाने

रमेश मोरे

जुनी सांगवी : जुनी सांगवी परिसरात शुक्रवार ता.१० दुपारी चारच्या सुमारास मेघगर्जनेसह आलेल्या अवकाळी पावसाने सांगवी परिसराला झोडपले.सुमारे तासभर पडलेल्या पावसाने रस्त्यांवरून पाणी वहात होते. अनेक ठिकाणी सखल रस्त्यांवर पाणी तुंबल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढत घर गाठावे लागले.

शनिवारी दुपारपर्यंत दुरुस्त्या न झाल्याने सकाळी चाकरमानी मंडळी, ईतर नागरिकांना तुंबलेल्या पाण्यातून वाट काढत मार्गक्रमण करावे लागले.स्थापत्य विभागाकडून ठिक ठिकाणी दुरुस्ती कामे सुरू करण्यात आली होती. श्रीकृष्ण मठासमोरील पवना नदी किनारा सखल रस्त्यावर पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी तुंबल्याने नागरिकांना पाण्यातूनच वाहने दामटत वाट काढावी लागली.

परिसरात पवना नदी किनारा सांगवी दापोडी रस्ता व सांगवी गावठाण संविधान चौक असे दोन रस्ते एकत्र येतात.गावठाण परिसरात श्रीराम मंदिर,श्रीकृष्ण मठ,महादेव मंदिर असल्याने परिसरात मोठी वर्दळ असते.दुस-या दिवशी दुपारपर्यंतही येथील दुरुस्ती करण्यात न आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात आला.

वळवाच्या पहिल्याच मोठ्या पावसात ममता नगर गल्ली क्रमांक तीन व चार या गल्ल्यांमधून पाणी तुंबल्याने रहिवासी नागरिकांना कसरत करत घर गाठावे लागले.सखल भाग पावसाळी पाण्याचा नियोजनाचा अभाव यामुळे अंतर्गत गल्ल्यांमधून पाणी तुंबले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.

भाजी विक्री होणा-या मैदानाचे झाले तळे- नागरिकांची कसरत

जुनी सांगवी येथील मध्यवर्ती भागात असलेल्या गजानन महाराज मंदिरासमोरील मैदान परिसरात पाणी तुंबल्याने एका बाजूच्या मैदानावर पाणी साचून तळे झाले होते.या मैदानावर भाजी विक्रेत्यांकडून भाजी विक्री करण्यात येते.समोर शाळा, करसंकलन कार्यालय ,अभ्यासिका केंद्र आहे. येथील अर्ध्या भागात सिमेंटचे पेव्हींग ब्लॉक लावण्यात आलेले आहेत.तर अर्धा भाग जैसे थे ठेवण्यात आलेला आहे.

येथे स्थापत्य विभागाकडून पाणी निचरा होण्यासाठी भुमिगत वाहिनी टाकण्यात आलेली आहे.मात्र चिखल,माती ईतर कचरा अडकून राहिल्यास येथून पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याने मोठ्या पावसात या परिसराला पाणी तुंबून तळ्याचे स्वरूप येते.

- पहिल्याच मोठ्या पावसात ठिक ठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढत घर गाठावे लागले. अनिल गायकवाड रहिवासी ममता नगर

- सांगवी गावठाण पवना नदी किनारा रस्ता, गजानन महाराज मंदिर परिसरात पाणी साचून राहिल्याने भाजी विक्रेते व नागरिकांना पाण्यातून वाट काढत कसरत करावी लागते. रूपेरी पुजारी नागरिक.

- पाणी तुंबणा-या ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू आहेत.स्थापत्य व आरोग्य विभागाच्या वतीने नालेसफाईची कामेही सुरू आहेत. प्रशांत कोटकर अभियंता स्थापत्य ह प्रभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'महाराष्ट्रात फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू आहे'; राज ठाकरेंची टीका

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT