Pune Ola Uber Rent Hike
Pune Ola Uber Rent Hike Esakal
पुणे

Pune Ola Uber Rent Hike: पुणेकरांच्या खिशाला बसणार झळ! पुण्यात ओला, उबरचा प्रवास महागला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील कॅबचा (ओला, उबर) प्रवास आता महागला आहे. कारण प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) याचे नवीन दर ठरविले असून त्याची एक जानेवारीपासून अंमलबजावणीस सुरवात झाली आहे. दर ठरविताना मुंबईतील एसी टॅक्सीच्या दराचा आधार घेण्यात आलेला आहे. पुण्यात पहिल्यादांच कॅबसाठी दर ठरविण्यात आले आहेत.

काळी-पिवळी टॅक्सीला पहिल्या १.५ किलोमीटरसाठी ३१ रुपये, त्यापुढील प्रत्येक एक किलोमीटरसाठी २१ रुपये तर वातानुकूलित टॅक्सीला (कुलकॅब) पहिल्या १.५ किलोमीटरसाठी ३७ रुपये व त्यापुढील प्रत्येक एक किलोमीटरसाठी २५ रुपये असा भाडेदर निश्चित करण्यात आला आहे. ‘आरटीओ’च्या माहितीनुसार पूर्वी असे दर नव्हते. मात्र प्रवाशांकडून कॅब चालक प्रतिकिलोमीटर १५ ते २० रुपये असे दर आकारत होते.

प्रवासीसेवा देणाऱ्या संबंधित कंपन्यांच्या चालकांनी ग्राहकांकडून कमी दर आकारत असल्याची तक्रार इंडियन गिग वर्कर्स फ्रंटचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांच्याकडे केली होती. त्यानंतर पुण्यात गिग वर्कर्सचा एक दिवसीय संपही झाला. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत दर ठरविण्याचा आदेश पुणे प्रादेशिक परिवहन विभागला देण्यात आला होता.

त्यानुसार पुणे आरटीओने खटुआ समितीच्या शिफारशीनुसार व सरकारी निर्णयातील तरतुदीनुसार दराचा अभ्यास केला. पुणे ‘आरटीए’समोर दरांचा प्रस्ताव मांडला. त्याला अध्यक्ष व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मान्यता दिली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी ) संजीव भोर यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT