Pune University sakal
पुणे

Pune University : विद्यापीठाने मराठीचा अनुशेष भरून काढला ; डॉ. सदानंद मोरे ,मराठी भाषा भवनाच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन

स्वातंत्र्यानंतर मराठी भाषेचे नाही, पण मराठीसाठी कार्य करणारे वि‌द्यापीठ स्थापन व्हावे, अशी अनेकांची इच्छा होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रूपाने ती प्रत्यक्षातही आली. मात्र, काळानुरूप विद्यापीठाची ध्येयधोरणे बदलली आणि मराठीसाठी रचनात्मक कार्य करण्याचे राहून गेले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : स्वातंत्र्यानंतर मराठी भाषेचे नाही, पण मराठीसाठी कार्य करणारे वि‌द्यापीठ स्थापन व्हावे, अशी अनेकांची इच्छा होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रूपाने ती प्रत्यक्षातही आली. मात्र, काळानुरूप विद्यापीठाची ध्येयधोरणे बदलली आणि मराठीसाठी रचनात्मक कार्य करण्याचे राहून गेले. परंतु, आज विद्यापीठाने मराठीसाठी कार्य करण्याचा अनुशेष मराठी भाषा भवनाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणातून भरून काढला, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत विद्यापीठातील मराठी भाषा भवनाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांच्या हस्ते झाले आले. याप्रसंगी प्रा. मोरे बोलत होते. कार्यक्रमास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. पंडित विद्यासागर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, प्रा. प्रभाकर देसाई, प्रा. तुकाराम रोंगटे उपस्थित होते. पुणे विद्यापीठाची स्थापना मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी झाली होती. मात्र, काळानुरूप इतर ज्ञानशाखा व विद्याशाखा विस्तारत गेल्या. त्यात मराठी भाषा विभागाकडे दुर्लक्ष झाले. मात्र, माजी कुलगुरू डॉ. अरुण निगवेकर यांच्या काळात विद्यापीठात मराठी भाषा भवन स्थापनेला मंजुरी मिळाली होती. काही वर्षांपूर्वी भाषा भवनाच्या इमारतीच्या कामाला सुरुवात झाली होती. अखेरीस मराठी भाषा भवनाचा पहिला टप्पा कार्यान्वित होत आहे.

हे काम चालणार

मराठी भाषा व साहित्य अध्ययन-अध्यापन प्रक्रिया,अध्यापन पद्धतींचा विकास व प्रशिक्षण, भाषा व बोली भाषांचा अभ्यास, भाषेचा कालिक अभ्यास, संस्कृती अभ्यास,अनुवाद अभ्यास, उपयोजित भाषाभ्यास व व्यवहार, शासकीय व्यावसायिक वा रोजच्या व्यवहारातील मराठी, साहित्य व इतर कला अभ्यास, ज्ञानभाषा निर्मिती प्रकल्प, भाषा प्रमाणीकरण, संशोधन आणि प्रशिक्षण, माहिती-तंत्रज्ञान अभ्यास, अमराठी भाषकांसाठी मराठीचे अध्यापन व प्रशिक्षण लोकसाहित्याभ्यास, तौलनिक भाषाभ्यास आणि साहित्य अभ्यास, बालसाहित्य या संदर्भात पायाभूत शैक्षणिक व संशोधनपर कार्य

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात राज्यभाषांना महत्त्व दिले आहे. त्या दृष्टीने मराठी भाषा भवनाचे महत्त्व वाढेल. वि‌द्यापीठ अनुदान आयोगाने कला, वाणिज्य, विज्ञान आणि आंतरविद्याशाखेतील बहुतांश विषयातील १५० पुस्तके मराठीत लिहिण्याची जबाबदारी सावित्रीबाई फुले पुणे वि‌द्यापीठाला दिली आहे. या दृष्टीने या मराठी भाषा भवनाला भविष्यात खूप काम करायचे आहे.

- प्रा. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

विसर्जनाला 'अशा' हटके पद्धतीने बनवा उकडीचे मोदक! काय आहे काकूंच्या मोदकांची खासियत? Ukadiche Modak Recipe

Marathi News Live Updates : ध्वनी प्रदुषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टाने सरकारला सुनावलं!

SCROLL FOR NEXT