Inauguration of operating room of Sardar Vallabhbhai Patel Hospital of Pune
Inauguration of operating room of Sardar Vallabhbhai Patel Hospital of Pune 
पुणे

कॅन्टोन्मेंटचे पटेल रुग्णालय सामान्यांसाठी ठरतेय वरदान- गोयल

मोहिनी मोहिते

कॅन्टोन्मेंट : गरजू रुग्णांना अद्यावत सुविधा मिळाव्यात, या भावनेतून सायबेज आशा ट्रस्ट व साबळे वाघिरे, पुणे रोटरी क्लब सारख्या ३५ सामाजिक संस्थांच्या मदतीने जागतिक दर्जाचे उपचार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात मिळणार आहेत. त्यामुळे सामान्यांची पायपीट आता थांबणार असून रुग्णालय आता गरजू रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे, असे कमांड हॉस्पिटलचे उपप्रमुख ब्रिगेडर डॉ. भुपेश गोयल सांगितले.

पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह दोन वर्षापूर्वी जळून खाक झाले होते. तेव्हापासून शस्त्रक्रिया बंद होत्या. आता सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून मॉडेल शस्त्रक्रियागृह उभारण्यात आले असून, त्याचा लोकार्पण सोहळा आज (शुक्रवार, दि. १ जुलै, २०२२) सायबेज आशा चॅरिटेबल ट्रस्टच्या रितू नथानी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी गोयल बोलत होते.

या सोहळ्याप्रसंगी दक्षिण कमांडचे महानिरीक्षक केजीएस चव्हाण, साबळे-वाघीरे ग्रुपचे सुधीर साबळे, पल्लवी साबळे, मुख्यकार्यकारी अधिकारी सुब्रत पाल, स्वीकृत सदस्य सचिन मथुरावाला आदी प्रमुख म्हणून उपस्थित होते. रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उषा तपासे,डॉ. महेश दळवी, डॉ. उदय बुजबळ यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी देखील उपस्थित होते.

या रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाला सप्टेंबर 2020 मध्ये आग लागल्याने ते जळून खाक झाले होते. त्यामुळे येथे शस्त्रक्रिया बंद होत्या. परिणामी रुग्णांना शस्त्रक्रियांसाठी खासगी किंवा इतर शासकीय रुग्णालयात जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन सायबेज आशा चॅरिटेबल ट्रस्टच्या रितू नथानी यांनी सीएसआरअंतर्गत तब्बल एक कोटी 62 लाख रुपये खर्च करुन रुग्णालयात मॉडेल शस्त्रक्रियागृह उभारले आहे. त्याचबरोबर साबळे वाघिरे कंपनीचे सुधीर साबळे, पुणे रोटरी क्लबच्या पल्लवी साबळे, अब्बास भाई कादरभाई अब्दुजी ट्रस्टचे चेअरमन फिरोज पूनावाला, क्रेडिट सुइस कन्सेंट इंडिया चे ललिना वाझ, ह्यसिंथ डिकोस्टा, टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन अशा 35 सामाजिक संस्थांनी वेगवेगळ्या विभागात रुग्णालयाला मदत केली आहे.

या विभागात एकूण चार शस्त्रक्रियागृह असून, त्यामध्ये दोन मोठ्या आणि दोन ठिकाणी छोट्या शस्त्रक्रियागृहांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने डोळे, कान, नाक, घसा, पोटांचे विकार, मूत्रपिंड, मणक्याचे आजार गर्भाशयाची पिशवी काढणे ब्रेस्ट गाठ, हर्निया, अपेंडिक्स, सांध्यांचे फ्रॅक्चर, जॉईंट रिप्लेसमेंट अशा गंभीर आजारांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

पूर्वी शस्त्रक्रियागृह असताना मोठ्या 500 आणि छोट्या सुमारे एक हजार शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. परंतु आता मॉडेल शस्त्रक्रियागृहामुळे दोन्ही शस्त्रक्रिया दुप्पट होतील. विशेषता रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली असून, पात्र रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत, अशी माहिती डॉ.महेश दळवी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: धोकादायक डेव्हिड मिलर आऊट; सुरुवातीच्या धक्क्यांनंतर गुजरातचा सावरला डाव

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT