Yogita Dharmendra Satav
Yogita Dharmendra Satav sakal
पुणे

बाका प्रसंग आला अन् तिनं बसचं स्टेअरिंग घेतलं हाती!

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : कार तिने अनेक वेळा चालवली. मात्र आणीबाणीचा प्रसंग आल्याने बसचे स्टेरिंग तिने (steering of the bus) प्रथमच हाती घेतले. अगदी धीटपणे महिलांना आधार देत तिने बस 10 किमी चालवत बस चालकाला उपचार मिळवून दिले. बसमधील महिलांनाही त्यामुळे आधार मिळाला. योगिता धर्मेंद्र सातव (Yogita Dharmendra Satav)असे तिचे नाव.

वाघोलीतील 23 जणी मोराची चिंचोली फिरायला गेल्या. दिवसभर मौज मजा केल्यावर बस मधून त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. काही अंतर जाताच बस चालवता चालवता 40 वर्षीय चालकाला फिट येण्याचे लक्षणे सुरू झाले. हा प्रकार सहलीच्या आयोजीका आशा वाघमारे यांच्या लक्षात आला. त्यांनी चालकाला त्वरित बस थांबविण्यास सांगितले. बस थांबताच चालकाला फिट आली. चालकाची अवस्था पाहून सर्व महिला घाबरल्या. चालकाला उपचाराचीही गरज होती. योगिता सातव या कार चालवतात.मात्र त्यांनी बस कधीही चालवली नव्हती. तरीही त्यांनी अगदी धीटपणे बसचे स्टेरिंग हाती घेतले. बस काही अंतर गेल्यावर चालकाला आणखी दोन फिट येण्याचे झटके आले. त्यामुळे महिला अधिकच घाबरल्या. त्यांनी मेडिकल स्टोअर्सची शोधाशोध सुरू केली. मात्र त्यांना मिळाले नाही. अखेर 10 किमी पुढे गणेगाव खालसा येथे बस आणली. तेथे चालकाचे प्राथमिक उपचार केले. त्या ठिकाणी बसचा दुसरा चालक आला. दुसऱ्या चालकाने शिक्रापूरला त्या बस चालकाला रुग्णालयात करून सर्व महिलांना वाघोली येथे सोडले. चालकाला फिट येणाचा त्रास होता. मात्र घाईत त्याने दररोजची औषधे घेतली नव्हती.

योगिता सातव यांच्या धाडसाने सर्व महिलांनी त्यांचे कौतुक केले. या धडसाबद्दल माजी सरपंच जयश्री सातव, माजी उपसरपंच राजेंद्र सातव यांनी तिचा सन्मान केला. यावेळी वर्षा आव्हाळे, स्वाती तांबे, नंदा सातव, सुरेखा सातव, कुंदा सातव उपस्तीत होते. मीना सातव यांनीही तिचे भरभरून कौतुक केले. उपचारानंतर चालकानेही आभार मानत महिलांची माफी मागितली.

सहली नंतर खरच आमच्यावर आणि बाणीचा प्रसंगच आला होता. मात्र माझे प्रसंगावधान व योगिता हिचे बस चालविण्याचे धाडस यामुळे चालकाला उपचार व महिलांना दिलासा मिळाला. -- आशा वाघमारे.

कार नेहमी चालविते. बस कधीही चालवली नव्हती. मात्र ग्रामीण भाग, कमी वाहतूक व आणीबाणीचा प्रसंग असल्याने धाडस करून बसचे स्टेरिंग हाती घेतले. 10 किमी व्यवस्थित व सुरक्षितपणे बस चालविली.

-योगिता सातव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT