incident in ghorpadi is death of elderly woman in train collision pune marathi news Sakal
पुणे

Pune News : रेल्वेच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू; घोरपडी परिसरातील घटना

आजीच्या अपघाती मृत्यूमुळे नाती झाल्या अनाथ

सकाळ वृत्तसेवा

घोरपडी: घोरपडी परिसरातील भारत फोर्ज कंपनीजवळ मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रेल्वेचा भोंगा जोरात वाजत होता... जाधव वस्तीतील काही नागरिक रेल्वेमार्गाकडे धावून गेले काही क्षणातच वस्तीतील ज्येष्ठ महिलेला वेगवान रेल्वेची धडक बसली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आजीच्या अपघाती मृत्यूमुळे दहा आणि बारा वर्षांच्या दोन्ही नाती अनाथ झाल्या. कांता अशोक खरारे (वय ७०, रा. जाधव वस्ती, घोरपडी) असे अपघातात मृत्यमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. त्या दुपारी कामावरून घाईघाईने घरी जात होत्या.

त्यावेळी रेल्वेची धडक बसून त्यांचा मृत्यू झाला. काही वर्षांपूर्वी मुली लहान असताना त्यांची आई घर सोडून निघून गेली. वर्षभरापूर्वीच वडिलांचेही निधन झाले. तेव्हापासून आजीच स्वच्छतागृहांची साफसफाई करून नातीचा सांभाळ करीत होती. त्यांना आजी हाच एकमेव आधार होता. या घटनेमुळे दोन नातींचा एकमेव आधारही हरपला.

शाळेत असताना नातींना आजीच्या मृत्यूची बातमी समजली. त्यांनी घराकडे धाव घेतली. लांबूनच रेल्वे मार्गावर निपचित पडलेला आजीचा मृतदेह पाहून त्यांनी एकच आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मृतदेह दोन तास रेल्वे रुळावरच पडून-

रेल्वे पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करण्यासाठी दिरंगाई केली. सुमारे दोन तास मृतदेह रेल्वे रुळावरच पडून होता. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेलचा भडका, एसटीच्या तिकीट दराचे काय? परिवहन मंत्री म्हणाले, महामंडळाला तोटा होतोय, सध्या...

Ambenali Accident: आंबेनळी ठरतोय मृत्यूचा घाट, ८ वर्षांपूर्वी झालेला ३३ जणांचा मृत्यू; गेल्या तीन महिन्यात तिसरी दुर्घटना

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

SCROLL FOR NEXT