khadakwasla canal
khadakwasla canal sakal
पुणे

पाटबंधारेच्या कालव्याला लागणार मिळकतकर?

​ ब्रिजमोहन पाटील

खडकवासला धरणाचे कालवे पुणे शहरातून वाहत जातात. या शासकीय जमिनीला मिळकतकर लावण्याची प्रक्रिया सुरू असून, कालव्यासाठी शहरातील किती क्षेत्र संपादित केले आहे.

पुणे - खडकवासला धरणाचे कालवे पुणे शहरातून वाहत जातात. या शासकीय जमिनीला मिळकतकर लावण्याची प्रक्रिया सुरू असून, कालव्यासाठी शहरातील किती क्षेत्र संपादित केले आहे. याची माहिती मिळकतकर विभागाने पाणी पुरवठा विभागाला विचारली आहे. तसेच जुन्या कालव्याचा ६८ कोटी ४९ लाख ४९ हजार ५०१ रुपये मिळकतकर थकबाकी असल्याचेही मिळकतकर विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे महापालिकेकडून शहरातील शासकीय, खासगी मिळकती, मोकळ्या जागा, व्यावसायिक जागांना मिळकतकर लावला जातो. गेल्या वर्षभरात अनेक शासकीय संस्थांकडून मिळकतकराची थकबाकीसह चालू वर्षाचा कर देखील वसूल केला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात महापालिकेने २१०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठरवलेले आहे. त्यासाठी महापालिकेने त्यादृष्टीने कर वसुलीचे नियोजन केले आहे.

पुणे महापालिकेच्या हद्दीतून खडकवासला पाटबंधारे विभागातील जुना व नवा कालवा वाहत आहे. ही जागा पाटबंधारे विभागाची असली तरी त्यावर मिळकतकर लावता येऊ शकतो. महापालिकेने जुन्या कालव्याला मिळकतकर लावला असून, त्याचा ६८ कोटी पेक्षा जास्त रकमेचा कर थकलेला असल्याची नोंद मिळकतकर विभागाकडे आहे. पण नव्या कालव्‍याचे एकूण क्षेत्र किती, पुणे शहराच्या हद्दीतून किती किलोमीटर लांबीचा कालवा गेलेला आहे याची माहिती मिळकतकर विभागाने पाणी पुरवठा विभागाला विचारली असून, त्याचे पत्र दिले आहे.

दरम्यान, पाणी पुरवठा विभाग हे पाटबंधारे विभागाकडून केवळ पाणी घेऊन शुद्धीकरण करून त्याचे शहरात वितरण करते. तसेच त्यासाठी ठरवून दिलेल्या दरानुसार पाटबंधारेला पैसे दिले जातात. पण आमच्याकडे कालव्याचे क्षेत्रफळ किती याची माहिती नसल्याची भूमिका घेतली आहे. ही माहिती भूमी जिंदगी विभागाकडून मिळू शकेल असे मिळकतकर विभागाला तोंडी कळविले असून, त्याचे पत्र देखील दिले जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हद्दवाढीमुळे क्षेत्र वाढले

पुणे महापालिकेची जुलै २०२१ मध्ये हद्दवाढ झाली, खडकवासला धरण आता महापालिकेच्या हद्दीत आले आहेत. तर मांजरीपर्यंतचा भागही महापालिकेत आला आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या कालव्याचे क्षेत्रफळ वाढले गेले आहे. या शासकीय जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम १३३ नुसार मिळकतकर आकारणे शक्य आहे. खडकवासला ते मांजरी हद्दीपर्यंतचे अंतर सुमारे ३० किलोमीटर इतके आहे, शासकीय दरानुसार कर आकारला तरी कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळणे शक्य आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT