शिरूर तालुक्‍यातून डाळिंबाच्या मागणीत वाढ
शिरूर तालुक्‍यातून डाळिंबाच्या मागणीत वाढ  
पुणे

डाळिंब उत्पादकांच्या हाती पैसा

युनूस तांबोळी

शिरूर तालुक्‍यात आवक कमी झाल्याने मागणीत वाढ

टाकळी हाजी (शिरूर): डाळिंब बागेचे व्यवस्थापन करत असताना मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवावे लागते. त्यातून बाजारभाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा उखडून टाकल्या. मात्र सध्या डाळिंबाच्या बाजारभावात वाढ झाल्याने उत्पादकांच्या हाती पैसा खेळू लागला आहे. आवक कमी व मागणीत वाढ झाली आहे. बोटावर मोजण्या इतक्‍याच उत्पादकांना या बाजारभावाचा लाभ मिळत असल्याचे दिसून येत आहे.

परराज्यांतून डाळिंबाला मागणी वाढल्याने हा बाजारभाव वाढल्याचे कळते. डाळिंबाला बाराही महिने हंगाम असतो. शिरूर तालुक्‍यात डाळिंबाच्या बागेचे मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन केले जाते. या महिन्यात बहुतेक ठिकाणी या बागांचे व्यवस्थापन करून उत्पादनाचा हंगाम सुरू आहे. साधारण 30, 35 ते 40 रुपये प्रतिकिलो प्रतवारीनुसार डाळिंब विकले गेले. त्यामुळे उत्पादनाला जुळविलेले भांडवलदेखील वसूल झाले नाही. या काळात आवक जास्त असल्याने या पिकाला बाजारभाव मिळाला नसल्याचे जाणकार सांगतात.

सध्या डाळिंबाला 80, 90, 100 ते 110 रुपये प्रतिकिलोने प्रतवारीनुसार बाजारभाव आहेत. त्यामुळे या काळात हाताशी आलेले उत्पादनातून डाळिंब बागायतदारांच्या हातात पैसा दिसू लागला आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, कोलकता, दिल्ली, जम्मू या ठिकाणाहून डाळिंबांना मागणी वाढू लागली आहे. काही राज्यांतील डाळिंबाच्या उत्पादनात घट झाल्याने या वेळी डाळिंबाचे भाव वाढले आहेत.

परराज्यांतून डाळिंब पिकाला वाढलेली मागणी, तेल्या रोगाने अनेक शेतकऱ्यांनी बागा उखडून टाकल्याने उत्पादनात आलेली घट यामुळे सध्या आवकपेक्षा मागणी वाढलेली दिसून येते. यापुढील काळात आवक घटणार असल्याने डाळिंबाचे भाव वाढण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांनी बागेचे योग्य व्यवस्थापन करून उत्पादित मालाच्या विक्रीचे नियोजन करावे.
- सुरेश भाकरे, डाळिंब उत्पादक, टाकळी हाजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT