पुणे : महाविद्यालय म्हणले की, क्लास बंक करणे आलेच, पण लाॅकडाऊनच्या काळात नेमका उलट परिणाम झाला असून, व्हर्च्युअल क्लासरूममध्ये विद्यार्थ्यांचे सहभागी होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ९० टक्के अभ्यासक्रमही संपल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने लाॅकडाऊन काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्राध्यापकांना वर्क फ्राॅम होम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर व्हॉट्सअॅप, ईमेल द्वारे प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासााठी येथे ► क्लिक करा
"वाणिज्य व व्यवस्थापन विभागाने विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एमबीए आणि एमसीए इंस्टिट्यूटच्या सुमारे २०० प्राध्यापकांना झूमद्वारे क्लास कसे घ्यायचे प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर पुणे, नगर, नाशिक येथील इंस्टिट्यूट गेल्या काही दिवसांपासून झूमद्वारे क्लास घेतले जात आहेत, त्याचा चांगला फायदा झाला आहे," असे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर यांनी सांगितले.
Lockdown : शेतमाल घरपोच देण्यासाठी वाहनमालकांसाठी किसान हेल्पलाईन
आकुर्डीतील डी. वाय. पाटील इंस्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटचे डॉ. आशुतोष मिसाळ म्हणाले, "सर्व विद्यार्थी गावाकडे आहेत. आॅनलाईन क्लास घेताना पहिल्या दिवशी अडचणी आल्या, पण आता सर्वांना सोपे जात आहे. शिवाय इतर वेळी पेक्षा आता आॅनलाईन क्लासमध्ये सहभागी होण्याचे प्रमाण चांगले आहे. क्लास कोणी बुडवत नाही. तसेच गेल्या १० दिवसात शिल्लक असलेला अभ्यासक्रम संपत आला आहे."
अकोले येथील टेक्निकल कॅम्पस अकोलेचे संचालक डाॅ. प्रशांत तांबे म्हणाले, "आमच्या संस्थेत ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत. आॅनलाईन क्लास घेताना लॅपटॉपला इंटरनेटचा नेटवर्कचा प्राॅब्लेम होता. पण आता मोबाईलवरून क्लासमध्ये सहभागी होता येत आहे. त्यामुळे सर्वांचा प्रतिसाद चांगला आहे."
Lockdown : शेतमाल घरपोच देण्यासाठी वाहनमालकांसाठी किसान हेल्पलाईन
"लाॅकडाऊन झाल्याने आता उरलेला अभ्यासक्रम कसा संपणार याची चिंता होती. पण आता बर्यापैकी अभ्यासक्रम संपला आहे, ऑनलाईन व्हिडिओ क्लास असला तरी समजून घेण्यात अडचण आली नाही.
- क्रांती शेडगे, विद्यार्थ्यांनी
मेसेजला मिळते उत्तर
"क्लास सुरू असताना मध्येच काही विचारले तर अडथळा होतो, म्हणून आम्ही मेसेज करून शंका विचारतो. त्यावर सरांकडून उत्तर मिळते. त्यामुळे कोणालाच त्रास होत नाही, असे धनश्री वलवे हिने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.