पुणे

#ChildHealth मुलांमध्ये चष्मा लागण्याच्या प्रमाणात वाढ

सकाळवृत्तसेवा

पुणे - बदलत्या जीवनशैलीमुळे तीन ते बारा वयोगटांतील मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत असल्याचा ‘ट्रेंड’ आला असल्याचे अनेक नेत्ररोगतज्ज्ञांनी सांगितले. देशामध्ये हे प्रमाण १४ ते १५ टक्के असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण कमी म्हणजे सुमारे पाच ते सहा टक्के आहे.

अनुवंशिकतेपेक्षा एकाच जागेवर तासन्‌तास बसून मोबाईलवर एकटक पाहणे यामुळे चष्मा लागण्याचे प्रमाण वाढते आहे, असे नेत्ररोगतज्ज्ञांचे निरीक्षण आहे. तीन-चार ते बारा वयोगटातील मुले अनेकदा जेवण करताना टीव्ही किंवा आयपॅड पाहतात. तसेच, पालकही त्यांना खेळण्यासाठी गॅजेट्‌स देतात. तसेच, मैदानी खेळांकडे सध्या मुलांचे दुर्लक्ष होत आहे. खुल्या वातावरणात दूरवर पाहण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्याचा परिणाम त्यांच्या नजरेवर होतो. मोबाईल, टीव्ही, संगणक यांच्या वाढत्या वापराने डोळ्यांचा आकार वाढतो, डोळ्यातील बाह्य आवरण कमी पडते, त्यामुळे डोळे कोरडे होतात आणि डोळ्यांचे स्नायू थकतात, त्यातून डोळ्यांवर ताण येतो. परिणामी, चष्मा लागतो. लहान मुले एका कुशीवर झोपून मोबाईल पाहतात, त्यामुळे एकाच डोळ्यावर जास्त ताण येतो, यातून ‘लेझी आय’ हा त्रास होतो. मोबाईल वापरण्याच्या चुकीच्या पद्धती, मोबाईलचा ब्राईटनेस जास्त असणे, स्क्रीन छोटा असणे, फाँट साईज कमी असणे यामुळेदेखील डोळ्यांवरील ताण वाढतो, असेही नेत्ररोगतज्ज्ञांनी सांगितले.

काळजी काय घ्याल?
मोबाईल, टीव्ही यांचा कमी वापर
कोणत्याही इलेक्‍ट्रॉनिक गॅजेटकडे मुलांना ४५ मिनिटांपेक्षा पाहू न देणे.
रोज किमान २० मिनिटे मैदानी 
खेळ खेळणे
दूध आणि फळे खाणे; त्यातून अ आणि ई जीवनसत्त्व मिळते.
योग्य पद्धतीत योग्य अंतर ठेवून गॅजेट्‌सचा वापर करणे.

मुलांनी आभासी खेळ खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळावेत, व्यायाम करावा, जंक फूडपेक्षा जीवनसत्त्वयुक्त आहार घ्यावा.
-डॉ. हेमंत तोडकर, नेत्ररोगतज्ज्ञ

मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण वाढते आहे. मैदानी खेळांपेक्षा इलेक्‍ट्रॉनिक गॅजेटकडे मुलांचा ओढा आहे. त्यातून डोळ्यांचे नुकसान होते. 
- डॉ. जाई केळकर, नेत्ररोगतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT