Indapur Babhulgaon Co-operative Societies election Hanuman Shetkari Vikas Panel wins pune sakal
पुणे

बाभुळगाव : सहकारी सोसायटी निवडणुक; हनुमान शेतकरी विकास पॅनल विजयी

बाभुळगाव ( ता. इंदापूर ) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणूकीत भाजप प्रणित हनुमान विकास शेतकरी पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : बाभुळगाव ( ता. इंदापूर ) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणूकीत भाजप प्रणित हनुमान विकास शेतकरी पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. ज्येष्ठ नेते पॅनल कल्याणबापू गुरगुडे, कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भास्कर गुरगुडे, राजाभाऊ इंगळे यांच्या नेतृत्वाखालील हे संपूर्ण पॅनल विजयी झाले असून माजी सहकार मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील,जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे,कर्मयोगी कारखान्याच्या माजी उपाध्यक्षा श्रीमती पदमाताई भोसले यांनी पॅनल प्रमुख, प्रचार प्रमुख भारत आसबे व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम.पी.राऊत यांनी काम पाहिले.विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :भारत यादव व युवराज जाधव - दोघेही बिनविरोध. दीपक गुरगुडे, हनुमंत देवकर, पंडित गुरगुडे, पोपट भोसले, दत्तात्रय देवकर, संतोष बोंद्रे, राजेंद्र भोसले, लक्ष्मण राखुंडे, सुंदराबाई चव्हाण, आशा जावळे, विठ्ठल मोरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

Scam Alert Kolhapur : गोलमाल है भाई गोलमाल है! एक गाव आणि चार भक्त निवास, आणखी दोन भक्त निवासासाठी ४० लाखांची मंजुरी

पुण्यातील ऐतिहासिक पर्वती टेकडीचे सौंदर्य धोक्यात? TDR वाटपाचा वाद पुन्हा पेटला; चतुःशृंगी-शनिवारवाड्याला वेगळा न्याय का?

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये डेंग्यूचा कहर, ४०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद

iPhone 17 आजपासून भारतात उपलब्ध, खरेदीसाठी स्टोअरबाहेर झुंबड; मध्यरात्रीपासून रांगेत, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT