उद्धट, ता १३ : उद्धट (ता. इंदापूर) परिसरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हामुळे हैराण होते. पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी आणि जनावरांना मोठा दिलासा दिला. ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे दुपारनंतर अचानक आलेल्या वातावरणात गारवा निर्माण झाला. आता पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून तापमानात मोठी वाढ झाल्याने शेतीकामे खोळंबली होती. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला होता. आजच्या पावसाने जमिनीला ओलावा मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळे विहिरी आणि शेततळ्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची आशा असून, खरीप हंगामाच्या नियोजनासाठी हे पोषक वातावरण असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असून, शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.