पुणे

बिजवडीत जुगार अड्ड्यावर कारवाई

CD

इंदापूर, ता.२३ : बिजवडी (ता. इंदापूर) येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये रोख रकमेसह पत्त्यांच्या सहाय्याने जुगार खेळणाऱ्या ११ जणांवर इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण ४३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत गणेश मच्छिंद्र डेरे, पोलिस अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखा, इंदापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २२ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे पावणेनऊच्या सुमारास बिजवडी गावच्या हद्दीत मंगेश खराडे यांच्या घराजवळील पत्र्याच्या शेडच्या बाजूला काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. यावेळी संशयितांकडून रोख रक्कम आणि पत्त्यांची पाने जप्त करण्यात आली.
याप्रकरणी नितीन गोरख तळेकर (वय ४२, रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर), विकास बबन सोनवणे (वय ३१, रा. बाभुळगाव, ता. इंदापूर), महेश मच्छिंद्र जाधव (वय ३८, रा. वेनेगाव, ता. माढा, जि. सोलापूर), संतोष महादेव गिरी (वय ४८, रा. सोनारी, ता. परंडा, जि. धाराशिव), आदिनाथ पोपट सरवदे (वय ४०, रा. सदाशिवनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर), मंगेश बाळू खराडे (वय २९, रा. बिजवडी, ता. इंदापूर), शुभम बापुराव तळेकर (रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर), उत्तरेश्वर जगन्नाथ पळसकर (रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर), गणेश महादेव दयाळ (रा. मुरूड, ता. जि. लातूर), सुमित लोंढे (रा. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) व सोनू मधुकर चव्हाण (रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार काळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

UPSC CAPF Success Story: एक एकर शेती, शेतमजुरी अन् जिद्दीच्या जोरावर UPSC CAPF मध्ये २७९ वा क्रमांक; प्रवीण स्वामींची यशोगाथा..

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Kas Plateau Flower Festival : कास पठारावरील फुले पाहण्यासाठी आता 200 रुपये शुल्क; पठारावर जाण्यापूर्वी जाणून घ्या Online Booking ची सोपी पद्धत

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

SCROLL FOR NEXT