Arrested
Arrested Sakal
पुणे

इंदापूर पोलीसांना घरफोडी, वाहनचोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात यश

डॉ. संदेश शहा

इंदापूर - इंदापूर पोलीसांनी घरफोडी, वाहनचोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळत १ सियाज कार व १५ मोटरसायकल असा तब्बल १८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दि. १९ मे २०२२ रोजी इंदापूर शहरातील श्रीराम हौसिंग सोसायटी येथील स्वप्निल नाझरकर यांच्या घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कमेची घरफोडी तसेच सियाज मारुती या मोटार कारची ( नंबर एम ४२ बीबी २६३० ) चोरी झाली होती. गुन्ह्या मधील घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्या नंतर तीन आरोपी दिसले.

इंदापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने उल्हास नगर, मुंबई भागात जावून दि. २३ मे रोजी रितेश जितेंद्र विटकर(रा.वडारगल्ली इंदापूर), सागर रमेश कोष्टे (रा. साकी विहार रोड, मुंबई) यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीला गेलेली कारही जप्त केली. आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कोठडी घेवून पुढे तपास केला असता गणेश महादेव चौगुले व राहुल बाळासाहेब पवार दोन्ही (रा. वडारगल्ली इंदापूर ) यांची नावे निष्पन्न झाल्याने त्यांनाही पोलीसांनी अटक केली. त्यांच्याकडून एकूण १५ मोटार सायकल, १ मारुती सियाज कार तसेच सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १८ लाख ६ हजार रुपये किंमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला.

पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख,बारामती अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदशनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यबमुजावर,सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील,ज्ञानेश्वर धनवे, महेश माने, प्रदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे, सुधीर पाडुळे, अपर्णा जाधव,संजय धोत्रे, सहाय्यक फौजदार सतीश ढवळे, पोलीस नाईक महंमदअली मड्डी, बापू मोहिते, मामा चौधर, सलमान खान, माऊली जाधव, आप्पा हेगडे, पोलीस शिपाई विशाल चौधर, श्री नरळे व प्रविण शिंगाडे या पथकाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT