हर्षवर्धन पाटील Sakal
पुणे

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या : हर्षवर्धन पाटील

भाजप नेते तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे मागणीचे निवेदन दिले.

डॉ. संदेश शहा

इंदापूर : पुणे जिल्हा तसेच इंदापूर तालुक्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने फळबागा, इतर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे फळबागा व नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे पूर्ण करून त्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजप नेते तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे भाजप शिष्टमंडळासह केली. यावेळी भाजपच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप नेत्या व जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांना दिले.

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्यात तसेच इंदापूर तालुक्यात बुधवार, गुरुवार व शुक्रवारी रात्री जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्याने द्राक्षे, केळी, डाळिंब, पेरू या फळबागांचे तसेच कांदा, शेवगा व मका ,ज्वारी, चारा पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक फटका बसल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. त्यातच अजून कोरोनाचे संकट असल्याने शेती पिकांना चांगला बाजारभाव मिळत नाही.

त्यामुळे अवकाळी पावसामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देऊन शासनाने दिलासा द्यावा, अशी मागणी श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली. यावेळी मुरलीधर निंबाळकर, लालासाहेब पवार,अँड कृष्णाजी यादव, मारुती वणवे, कांतीलाल झगडे, विलास वाघमोडे, देवराज जाधव, मोहन दुधाळ, गजानन वाकसे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : आदित्य पंचोली विरोधात दाखल अत्याचार प्रकरणातील FIR रद्द करण्यासाठी 28व्यांदा सुनावणी

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT