Murder
Murder Sakal
पुणे

इंदापूर : पोटच्याच मुलाने केली मातेची निर्घृण हत्या

सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : काझड (ता.इंदापूर) येथे आईचा खून करुन (Murder) वडिलांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमित नरुटे या आरोपीला वालचंदनगर पोलिसांनी सापळा रचून पुण्याजवळील खडकी रेल्वे स्टेशनवरती अटक (Arrest) केली.

अमित पांडुरंग नरुटे (वय- ३१, वर्षे रा.सिधोबाची वस्ती, काझड) याला पोलिसांनी जेरबंद केले. रविवार (ता.२) रोजी पहाटे १ च्या सुमारास अमित याने आई अलका पांडुरंग नरुटे ( वय -55 रा. काझड) या महिलेच्या डोक्यात तसेच अंगावर लोखंडी कोयत्याने सपासपा वार करुन तिची निघृण हत्या केली होती. तसेच वडिल पांडुरंग बाबुराव नरुटे (वय ६०) यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. खूनानंतर रात्रीच्या वेळी अमित पसार झाला. तो मुंबई व ठाण्यामध्ये गेला होता. (Pune Crime News)

आज अमितने रेल्वेस्टेशनवरुन दुसऱ्याच्या मोबाईलवरुन मित्राला फोन करुन चेन्नई एक्सप्रेसने गुलबर्ग्याकडे निघाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील पोलिस व वालचंदनगर पोलिस अमितवर पाळत ठेवून होते. पोलिसांनी चेन्नई एक्सप्रेस थांबणाऱ्या सर्व रेल्वे स्टेशनवरती सापळे रचले होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पुण्याजवळील खडकी रेल्वे स्टेशन येताच पोलिसांनी अमितला अटक केली.

सदरची कारवाई पुणे जिल्हाचे पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे, पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे, नितीन लकडे, साहय्यक फौजदार शिवाजी निकम, रविंद्र पाटमास, मोहन ठोंबरे, उत्तम खाडे, अमोल चितकोटे, शैलेश स्वामी, किसन बेलदार यांनी परिश्रम केले.

३ वर्षाची मुलगी सुखरुप...

अमित नरुटे याने आईचा खून केल्यानंतर स्व:ताची तीन वर्षाची मुलगी अदिरा हिला कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील बालसंगोपन केंद्रामध्ये ठेवून ठाण्याला गेला होता. व आज (बुधवार) तो पुन्हा मुलीकडे गुलबर्ग्याला निघाला होता. अमितला अटक केल्यानंतर पोलिसांना अदिराची माहिती मिळाल्यानंतर वालचंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नितीन लकडे तातडीने गुलबर्ग्याकडे रवाना झाले असून मुलगी सुखरुप असल्याची माहिती मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT