Harshwardhan Patil, Dattatray Bharne
Harshwardhan Patil, Dattatray Bharne sakal
पुणे

इंदापूर तालुक्यात दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

डॉ. संदेश शहा

इंदापूर तालुक्याचे राजकारण निर्णायक टप्प्यावर, आगामी निवडणुकीत मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिष्ठा पणाला तर माझी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई.

इंदापूर - इंदापूर तालुक्यात मिनी आमदारकीची समजली जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला असून, तालुक्याचे राजकारण निर्णायक वळणावर येवून ठेपले आहे. ही निवडणूक सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रतिष्ठेची, तर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाची ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुका चुरशीच्या होणार असून, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, विरोधी भाजपा पुन्हा आमने सामने लढणार आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेसने देखील निवडणूक लढविण्याची महागर्जना केली आहे. तर बीएमपी देखील या निवडणुकीतआपली ताकद आजमावणार आहे. त्यामुळे राजकीय महासंग्राम जोरात रंगणार आहे. त्यातच यंदा जिल्हा परिषदेचे दोन गट, पंचायत समितीचे चार गण वाढल्याने नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

इंदापूर तालुक्यात यापूर्वीच्या निवडणुकीत ७ गट आणि १४ गण होते.जिल्हा परिषदेच्या २ जागा वाढल्याने एकूण ९ तर पंचायत समिती च्या ४ जागा वाढल्याने एकूण १८ जागा झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय फिवर वाढला आहे. मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने ४, तर काँग्रेसने ३ जागी बाजी मारली होती. तर पंचायत समितीत काँग्रेसने ९, तर राष्ट्रवादीने ५ जागी विजय मिळवला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर सुध्दा पंचायत समिती पाटील यांच्याच ताब्यात राहिली. याउलट पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे हे विधानसभा निवडणुकीपासून आपले भाऊ तथा जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांच्या समवेत हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत आल्याने पंचायत समितीत पाटील यांची ताकद वाढली.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. मात्र भरणे यांचा विजय तसेच पाटील यांचा पराभव काठावर झाल्यानंतर भरणे यांना महाविकास आघाडी सरकार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विविध खात्यांचे राज्य मंत्री पद देण्यात आले. त्यानंतर भरणे यांनी कामाचा धूमधडाका लावत तालुक्याच्या विकासासाठी विक्रमी निधी आणला. त्यातून तालुक्यात रस्त्यांसह वीज, आरोग्य, शिक्षण व बांधकाम यांची मोठ्या प्रमाणावर कामे झाली. मात्र रस्त्याची कामे दर्जेदार झाली नसल्याचे काही गावात नागरिकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने वीज तोडल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन उभे राहिले. त्यामुळे राजकारण दोलायमान झाले. मात्र, येत्या सर्व निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना इंदापूर तालुक्यात आले. त्याला उत्तर म्हणून भाजपच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांना तालुक्यात आणण्यात आले. त्यामुळे राजकारण संवेदनशिल ठरले.

मात्र मंत्री भरणे यांनी लाकडी निंबोडी पाणी पुरवठा योजनेस मंजुरी घेवून त्यासाठी निधी देखील मंजूर करून राजकारणात निर्णायक आघाडी घेतली. भरणे यांनी बेरजेचे राजकारण करत शासनाच्या योजना घरोघरी पोहोचवल्या असून जनसंपर्क देखील वाढवला आहे. त्याचा फायदा त्यांना निवडणुकात होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. हर्षवर्धन पाटील यांनी अप्पासाहेब जगदाळे व सहकाऱ्यांना बरोबर घेवून नीरा भीमा, कर्मयोगी कारखाना निवडणूक बिनविरोध केली आहे. त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून जनसंपर्क ठेवला. मात्र, तो मर्यादित असून सोशल इंजिनिअरिंगचा अभाव आहे. तीन पिढ्यांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यां ना राजहट्टापायी न्याय दिला जात नाही. श्री. पाटील यांना भेटण्यासाठी केलेले फोन व्यवस्थित घेतले जात नाहीत. अशी सर्वांची खाजगीत तक्रार आहे. त्यामुळे पाटील यांची कार्यपद्धत वस्तुनिष्ठ नाही. तसेच त्यांना भाजपने मोठे पद दिले नाही. त्यामुळे या निवडणुका त्यांच्या अस्तित्वाची तर भरणे यांच्या प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यामुळे वाढलेले गट व गणांचा लाभ कोणाला होणार यावर पुढील राजकीय समीकरण अवलंबून आहे. ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है! म्हणणारे मंत्री भरणे व मुकद्दर का सिकंदर म्हणणारे बाजिगर हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय डावपेचाकडे पडद्यामागील राजकीय किंगमेकर यांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

SCROLL FOR NEXT