पुणे

इंदापूरच्या कोरड्या मातीला ओला सांगावा

CD

कळस, ता. २० : इंदापूर तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने शेतातील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली असतानाच शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक माहिती समोर आली आहे. बुधवारी (ता. १८) खडकवासला कालव्यातून शेती सिंचनासाठी सोडण्यात आलेले आवर्तन रविवारी (ता. २२) तालुक्यात दाखल होण्याचा अंदाज जलसंपदा विभागाने वर्तवला आहे. ‘टेल टू हेड’ या पद्धतीने देण्यात येणारे हे आवर्तन तालुक्यातील तहानलेल्या पिकांसाठी वरदान ठरणार आहे.
इंदापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून, उभ्या पिकांची पाण्याची गरज वाढली आहे. पिण्याच्या पाणी योजना अवलंबून असलेले तलाव कोरडे पडले आहेत. विहिरींच्या पाणी पातळीने तळ गाठलेला आहे. शेततळ्यांची पाणी पातळी खालावली आहे. अशा परिस्थितीत पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रब्बी हंगामातील पिके काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या आणि फळबागांना पाण्याची अत्यंत गरज आहे. गत आवर्तनास दोन महिन्यांचा कालावधी होत आला आहे. या आवर्तनाचा प्रामुख्याने ऊस, चारा पिके आणि फळबागांना मोठा आधार मिळणार आहे. विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही अंशी सुटण्यास मदत होईल. मात्र, इंदापूर तालुक्यातील सिंचन पूर्ण झाल्याशिवाय इतर तालुक्यात पाणी देवू नये, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

तलावांत पाणी सोडण्याची मागणी
इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याची वहन क्षमता सुमारे ८०० क्यूसेक आहे. मात्र, तालुक्यात येणारे पाणी हे ४०० क्यूसेकहून कमी प्रवाहाने येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. अनेकदा उन्हाळ्याच्या तोंडावर अगदी १५०- २०० क्यूसेकने पाणी आल्याची उदाहरणे आहेत. या कमी दाबामुळे शेती सिंचनाला पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. उन्हाळ्यातील आवर्तन काळात कालव्याला नावापुरतेच पाणी दिले जात असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे या आवर्तन काळात तालुक्याला पूर्ण दाबाने पाणी देण्याबरोबर तलावांमध्ये पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

इंदापूर तालुक्यात पाणी रविवारपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. ‘टेल टू हेड’ या पद्धतीने सुरवातीला इंदापूर तालुक्यातील सिंचन पूर्ण केले जाईल. यानंतर पुढील पाणी वाटप करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, तलावांमध्ये पाणी सोडण्याचे नियोजन नाही.
- पंकज हुलसुरे, उपविभागीय अभियंता, खडकवासला पाटबंधारे इंदापूर उपविभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: नेस्को सेंटर मध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजीत सिंग याला तात्काळ अटक करा; मनसेची मागणी

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT