पुणे

यंदा एक ट्रिलियन डॉलर निर्यातीचे लक्ष्य; पाच वर्षांत दोन ट्रिलियन डॉलरचा संकल्प

CD

बातमी क्रमांक : may18ab02

यंदा एक लाख कोटी डॉलरची निर्यात करण्याचे उद्दिष्ट
पाच वर्षांत दोन लाख कोटी डॉलरचा संकल्प

नवी दिल्ली, ता. १८ : भारताने चालू आर्थिक वर्षात एक लाख कोटी डॉलरची निर्यात करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, पुढील पाच वर्षांत ते दोन लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्याचा संकल्प असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. निर्यातवाढ हे केवळ आर्थिक उद्दिष्ट नसून, राष्ट्रीय मोहिम असून, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देऊन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचे आवाहन त्यांनी केले. दिल्लीत भारतीय व्यापार महोत्सवाच्या संकेतस्थळाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘भारताने यंदा एक लाख कोटी डॉलर निर्यातीचे आणि पुढील पाच वर्षांत दोन लाख कोटी डॉलर निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हीच आत्मनिर्भर भारताची खरी ओळख ठरेल. जागतिक आव्हानांनंतरही यंदा भारताची निर्यात ८६३ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून, ती गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे पाच टक्क्यांनी अधिक आहे. भारताने जगातील सुमारे ३८ विकसित देशांशी मुक्त व्यापार करार (एफटीए) करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या करारांमुळे भारतीय उद्योगांना जागतिक बाजारपेठांमध्ये अधिक प्रवेश मिळेल आणि निर्यातीस चालना मिळेल.’’

आयात नको, देशांतर्गत उत्पन्न वाढवा
भांडवली वस्तूंसारख्या क्षेत्रांत भारत अजूनही परदेशांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. राजकोट, जालंधर, लुधियाना, बटाला आणि पुणे येथील औद्योगिक समूहांनी आयातीवर अवलंबून राहण्याऐवजी देशांतर्गत उत्पादन वाढवावे. वैद्यकीय उपकरणांच्या वाढत्या देशांतर्गत उत्पादनाचाही त्यांनी उल्लेख केला. विशाखापट्टणम येथे तयार करण्यात आलेल्या सीटी स्कॅन यंत्राचे उदाहरण देत गोयल यांनी भारतीय उत्पादनांचा अधिक वापर झाल्यास मागणी आणि उत्पादनक्षमता दोन्ही वाढतील, असे नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवसेना कुणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात; शिंदेंना धक्का बसणार? ठाकरेंच्या वकिलांचा तगडा युक्तिवाद

प्रेम हरवतं... एकीकडे हिमांशूंपासून वेगळं होण्याच्या चर्चा अन दुसरीकडे अमृताच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणते- आपल्याला...

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल असे विधान केले जाणे अत्यंत दुर्दैवी - रितू तावडे

'फक्त मीच म्हातारा होतोय आणि तू...' जेनिलियासाठी रितेशची हटके पोस्ट, म्हणाला...'सुपर मॉम...'

Bombay High Court: सेवानिवृत्त शिक्षकांना मोठा दिलासा! मुंबई उच्च न्यायालयाचे ‘काल्पनिक वेतनवाढ’ मंजूर करण्याचे आदेश, नोशनल इन्क्रिमेंट’ मंजूर, पेन्शन वाढणार

SCROLL FOR NEXT