Sanjay-Dhotre 
पुणे

भारतात ज्ञानाधारीत अर्थव्यवस्था गरजेची - संजय धोत्रे

सकाळवृत्तसेवा

पुणे - डिजिटल इंडियासाठी भारतात ज्ञानाधारीत अर्थव्यवस्था उभी राहणे गरजेचे आहे. स्मार्ट फोनच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत आता जगात दुसऱ्या क्रमांकावर पोचला आहे. डिजिटल इंडियाची मोहीम वेगवान करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उत्पादने हा मुख्य घटक असून, त्यासाठी प्रयोगशाळेतील उत्पादनांचे व्यावसायिकीकरण करणे आव्हानात्मक आहे, असे मत केंद्रातील इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी व्यक्त केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाषाण येथील सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीच्या (सी-मेट) व्हर्च्युअल वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत, मंत्रालयाचे सचिव अजय सावनी, विशेष सचिव (अर्थ) ज्योती अरोरा, दक्षिण कोरियातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. रेडनी रॉफ, सी-मेटचे महासंचालक डॉ. भारत काळे, समन्वयक डॉ. रणजित हवालदार, डॉ. सुधीर अरबुज उपस्थित होते. वर्धापनदिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्थविज्ञान परिषदेचे उद्‍घाटनही यावेळी करण्यात आले. भारत हा जगाच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचे केंद्र बनावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे धोत्रे म्हणाले. 

डॉ. सारस्वत यांनी इलेक्ट्रॉनिक्स मटेरिअल उत्पादनात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. वर्धापनदिनानिमित्त डॉ. रॉफ यांनी ग्राफिनवर विशेष व्याख्यान दिले.

डॉ. सारस्वत म्हणाले...

  • इलेक्ट्रॉनिक्स पदार्थांवरील काम उल्लेखनीय असले तरी आपण खूप मागे
  • इलेक्ट्रॉनिक्ससाठी लागणाऱ्या पदार्थांची मोठ्या प्रमाणावर आयात होते
  • देशातील फोटोव्होल्टाइक, सेमिकंडक्टर बाजारपेठेला पदार्थांची आवश्यकता
  • एनर्जी मटेरिअल, ग्राफिन, सेन्सर, सिलिकॉन कार्बाईड, आयओटी डिव्हायसेसच्या उत्पादनात वाढ 
  • सरकार, उद्योग आणि संशोधन संस्थांनी यात अधिक लक्ष घालायला हवे

सॉफ्टवेअर उत्पादनाच्या बाबतीत भारत जरी पुढे असला तरी हार्डवेअरच्या बाबतीत आपण अजूनही मागे आहोत. हार्डवेअरचे उत्पादन हे पदार्थतंत्रज्ञानावर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याला पदार्थ विकासावर विशेष लक्ष केंद्रित करायला हवे.
- डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT