पुणे

अवकाश युद्धासाठी भारत सज्ज 

सकाळवृत्तसेवा

पुणे - मिशन शक्ती म्हणजे उपग्रहभेदी क्षेपणास्त्र प्रणाली ही केवळ एक चाचणी नव्हती, तर जगासमोर अवकाश युद्धातील भारताच्या सामर्थ्याचे प्रदर्शन होते. भारत लवकरच विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत जाईल, याचे ते द्योतक आहे. भविष्यातील अवकाश युद्धासाठी भारत सज्ज आहे, असे प्रतिपादन संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) मिशन शक्तीचे संचालक डॉ. यू. राजाबाबू यांनी केले. 

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) येथे आयोजित विज्ञान दिनाच्या व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी "एनसीएल'चे संचालक डॉ. ए. के. नांगिया उपस्थित होते. "क्षेपणास्त्र आणि अवकाश संरक्षणातील भविष्यातील आव्हाने' या विषयावर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""तंत्रज्ञानाने युद्धाचा परिप्रेक्ष्यच बदलला आहे. तलवार, भाल्याच्या वापरापासून सुरू झालेले युद्ध आता क्षेपणास्त्र आणि उपग्रहांपर्यंत येऊन ठेपले आहे. भविष्यात अवकाश युद्धामध्ये आधुनिक संगणक प्रणाली, ऍडव्हान्स अल्गॉरिदम, रडार, सेन्सर यांचे सर्वांत जास्त महत्त्व असेल.'' 

युद्धामध्ये वेळेची आणि माऱ्याची अचूकता वाढली आहे. एका जागेवर बसून तंत्रज्ञान आणि माहितीच्या साह्याने युद्धभूमी आणि अवकाशातील युद्धाचे संचालन केले जाईल. त्यासाठी आवश्‍यक सर्व तयारी भारतीय शास्त्रज्ञ करीत असून, नववैज्ञानिकांनीही यामध्ये रुची निर्माण करायला हवी, असे डॉ. राजाबाबू म्हणाले. 

अवकाश युद्धाचे प्रकार 
- जमिनीवरून उपग्रह भेदणारे क्षेपणास्त्र (मिशन शक्ती) 
- अवकाशात उपग्रहानेच शत्रूचा उपग्रह नष्ट करणे (संरक्षण उपग्रह) 
- लेसर, मायक्रोवेव्हसारख्या उच्च ऊर्जाकिरणांचा वापर करून उपग्रह आणि क्षेपणास्त्र नष्ट करणे 
- इलेक्‍ट्रॉनिक वॉरफेअर 

उपग्रहाच्या तुकड्यांचा धोका संपला 
उपग्रह भेदक क्षेपणास्त्राच्या चाचणीच्या वेळी निर्माण झालेल्या उपग्रहाच्या तुकड्यांचा धोका संपला आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 320 किलोमीटर अंतरावर असलेल्या या उपग्रहाचे बहुतेक तुकडे नष्ट झाले आहेत. त्यातील फक्त 10 तुकडे शिल्लक राहिले असून, त्यावर आमची नजर आहे, असे डॉ. राजाबाबू यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT