indian army used leopard urine faeces during surgical strike says rajendra nimborkar at pune
indian army used leopard urine faeces during surgical strike says rajendra nimborkar at pune 
पुणे

'सर्जिकल स्ट्राइकदरम्यान केला बिबट्याच्या विष्ठेचा वापर'

सकाळवृत्तसेवा

पुणेः सर्जिकल स्ट्राइकच्या यशस्वी मोहिमेनंतर जगाला कळाले, की भारतीय लष्कर काय करू शकते. आपली राजनीती क्रिकेट सामने, समझोता एक्‍स्प्रेसपुरतीच मर्यादित नसून, कोणी हल्ला केला तर आपण योग्य प्रत्युत्तरही देऊ शकतो. भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइकदरम्यान बिबट्याच्या मलमूत्र आणि विष्ठेचा वापर केला अशी, अशी माहिती निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी दिली.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 318 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा "श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे शौर्य' पुरस्कार निंभोरकर यांना माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. निंभोरकर म्हणाले, '2016 मध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. कारवाई करण्यापूर्वी परिसराचा पूर्ण अभ्यास करण्यात आला होता. यावेळी परिसरात अनेकदा बिबट्या कुत्र्यांवर हल्ला करत असल्याची माहिती मिळाली होती. बिबट्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी कुत्रे रात्रीच्या वेळी स्थानिक परिसरात आसरा घ्यायचे. सर्जिकल स्ट्राइकची रणनीती आखताना आम्हाला रस्त्यात असणाऱ्या गावांमधून जाताना कुत्रे भुंकण्याची आणि हल्ला करण्याची शक्यता वाटत होती. कारवाई दरम्यान कुत्र्यांनी अडथळा आणू नये, यासाठी भारतीय लष्कराकडून बिबट्याच्या मलमूत्र आणि विष्ठेचा वापर केला गेला. यासाठी आम्ही सोबत बिबट्याचं मलमूत्र आणि विष्ठा सोबत नेली होती. आम्ही गावाच्या बाहेर त्यांचा वापर केला. आमची ही रणनीती चांगलीच यशस्वी झाली.'

'सर्जिकल स्ट्राइकची मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात आली होती. माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एका आठवड्यात सर्व तयारी करण्यास सांगितले होते. मी सैनिकांसोबत चर्चा केली होती, मात्र त्यांना जागेची माहिती दिली नव्हती. सर्जिकल स्ट्राइक करण्याच्या एक दिवस आधी त्यांना सांगितले होते. परिसराचा अभ्यास केल्यामुळे दहशतवादी तळांची माहिती मिळवली होती. शिवाय, आम्ही त्यांच्या वेळेचा अभ्यास केला आणि हल्ल्यासाठी पहाटे 3.30 ची वेळ निवडली. त्यापूर्वी आमचे सैनिक अडथळे पार करत सुरक्षितस्थळी पोहोचले होते. त्यांनी तीन दहशतवादी तळ नष्ट केले तसेच 29 दहशतवाद्यांचा खात्मा केला,' असेही  निंभोरकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये कपालेश्वर हॉटेलच्या मागच्या बाजूला आग

SCROLL FOR NEXT