Mango Export to america by sea
Mango Export to america by sea sakal
पुणे

भारतीय आंबा समुद्रमार्गे अमेरिकेत

सकाळ वृत्तसेवा

‘निर्यात खर्च कमी करून भारतीय आंबा अमेरिकेत रास्त दरात उपलब्ध होण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

पुणे - ‘निर्यात खर्च कमी करून भारतीय आंबा अमेरिकेत रास्त दरात उपलब्ध होण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. कारण देशातून पहिल्यांदाच समुद्रमार्गे आंबा निर्यात सुरू झाली आहे. हा क्षण ऐतिहासिक आहे,’’ अशी माहिती राज्याचे पणन संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा आणि सानप ॲग्रो ॲनिमल्स यांच्या प्रयत्नांतून समुद्रमार्गे भारतीय आंबा नुकताच अमेरिकेत निर्यात करण्यात आला. अमेरिकेचे क्वारंटाइन विभागाचे अधिकारी डॉ. कॅथरिन फिडलर, भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरच्या बायोसायन्स विभागाचे संचालक डॉ. टी. के. घंटी, ‘एनपीपीओ’चे उपसंचालक डॉ. झेड. ए. अन्सारी, ‘सानप ॲग्रो’चे संचालक शिवाजीराव सानप, ‘वाफा’चे अध्यक्ष अण्णा शेजवळ यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून हा कंटेनर अमेरिकेसाठी रवाना झाला.पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील म्हणाले, ‘‘ पाच हजार ५२० बॉक्समधून १६ हजार ५६० किलो आंबा कंटेनरद्वारे अमेरिकेला पाठविण्यात आला आहे. २५ दिवसांच्या सागरी प्रवासानंतर तो न्यूजर्सी शहराजवळील नेवार्क या बंदरात पोहोचणार आहे.’’

आंब्याच्या समुद्रमार्गे निर्यातीमुळे वाहतूक खर्च दहा टक्क्यांवर येणार असल्याने भारतीय आंबा अमेरिकेतील बाजारपेठेत इतर देशांतील आंब्याशी स्पर्धा करू शकेल. तसेच दीड महिन्याच्या जादा कालावधीसाठी तो तेथे उपलब्ध राहील.

- सुनील पवार, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ.

तीन वर्षे प्रयोग...

भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, अपेडा, पणन मंडळ यांच्यावतीने २०१९ मध्ये आंबा समुद्रमार्गे निर्यातीचा प्रयोग केला होता. यात आंब्यावर विविध प्रक्रिया करून तो कंटेनरमध्ये भरून कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधेद्वारे साठवणूक करून ठेवला होता. हा कंटेनर ३८ दिवसांनी उघडण्यात आला. त्यावेळी हा आंबा सुस्थितीत होता. मात्र, काही त्रुटी आढळून आल्याने त्या दुरुस्त करण्यात आल्या. त्यानंतर यंदा यशस्वीपणे आंबा निर्यात करण्यात आली आहे.

हवाईमार्गे निर्यातीत मर्यादा

  • २०१९ मध्ये अमेरिकेस एक हजार २०० टन आंबा निर्यात

  • २०२० व २०२१ मध्ये कोरोनामुळे निर्यात होऊ शकली नाही.

  • अमेरिकेला यापूर्वी होणारी आंबा निर्यात हवाईमार्गे होत

  • निर्यातदारांना प्रतिकिलो ५५० रुपये विमानभाडे द्यावे लागत

  • अमेरिकेत भारतीय आंबा महाग असल्याने निर्यातीवर मर्यादा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT