पुणे

निर्देशांकांमध्ये किंचित वाढ

CD

निर्देशांकांमध्ये किंचित वाढ 
चार दिवसांची घसरण खंडित

मुंबई, ता. १३ : अमेरिका-इराण तणावात फारसा बदल न झाल्यामुळे आज भारतीय शेअर बाजार निर्देशांकांमध्ये अल्प वाढ झाली. ‘सेन्सेक्स’ ४९.७४ अंशांनी, तर ‘निफ्टी’ ३३.०५ अंशांनी वाढला. या वाढीमुळे चार दिवसांची घसरण खंडित झाली.
आज दिवसभर निर्देशांकात चढ-उतार होत होते. काही वेळ ‘सेन्सेक्स’ ७५ हजारांच्या वरही गेला होता. मात्र, तेथे तो फार वेळ टिकू शकला नाही; पण त्याने ७४ हजारांचा स्तरही तोडला नाही. दिवसअखेर ‘सेन्सेक्स’ ७४,६०८.९८ अंशांवर, तर ‘निफ्टी’ २३,४१२.६० अंशांवर स्थिरावला. आज शेअर बाजारातील २,३२८ शेअरचे भाव वाढले, तर १,६९० शेअरचे भाव कमी झाले.
स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअरमध्ये तळाच्या भावाला खरेदी झाली. आता अमेरिका आणि चीन यांच्यातील शिखर परिषदेवर, जागतिक व्यापार धोरणांवर आणि आखातातील युद्धांवर सर्वांचे लक्ष आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. मे महिन्यात परदेशी वित्तसंस्थानी २१४६९ कोटी रुपयांचे शेअर विकले, तर देशी वित्तसंस्थांनी ३५,३२३ कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले.
बँका आणि वित्तसंस्थांच्या; तसेच आयटी क्षेत्राच्या शेअरमध्ये आज विक्री झाली. ‘सेन्सेक्स’मध्ये एशियन पेंट, टाटा स्टील, बीईएल, अदानी पोर्ट, एअरटेल, लार्सन अँड टुब्रो, इंडिगो, आयटीसी या शेअरचे भाव वाढले, तर महिंद्र आणि महिंद्र, पॉवरग्रिड, इन्फोसिस, टेक महिंद्र, बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व्ह, टीसीएस, सन फार्मा या शेअरचे भाव कमी झाले.

कोट......
भारतीय चलनवाढ मर्यादित असली, तरी इराणचा तणाव कायम आहे. अशा स्थितीत कच्च्या तेलाच्या आणि वस्तूंच्या भाववाढीमुळे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणावर निर्बंध येऊ शकतात, अशी बाजाराला भीती आहे.
- विनोद नायर, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स. 


रुपया ऐतिहासिक नीचांकी स्तरावर ...............
भारतीय रुपयाने आज अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ९५.८० असा ऐतिहासिक नीचांक गाठला. कच्च्या तेलाचे भाव पिंपामागे १०७ डॉलरवर गेल्याने आणि परदेशी वित्तसंस्थांची विक्री कायम राहिल्याने रुपयाची घसरण झाली. व्यवहार संपताना रुपया ९५.६३ वर स्थिरावला. मंगळवारी रुपया ४० पैशांनी घसरून डॉलरच्या तुलनेत ९५.६८ या नीचांकी पातळीवर बंद झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT