पुणे

स्वदेशी ''नेत्रा'' प्रणाली सज्ज

CD

बंगळूर, ता.२५ ः भारताची स्वदेशी बनावटीची ‘नेत्रा’ (एईडब्लू ॲंड सी) हवाई पूर्वसूचना आणि नियंत्रण प्रणाली गुरुवारी अंतिम कार्यात्मक मंजुरीच्या (एफओसी) टप्प्यावर पोहोचली. हवाई दलाच्या ताफ्यात या प्रणालीचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला असून, हा देशाच्या संरक्षण क्षेत्रातील एक मोठा टप्पा मानला जात आहे.
बंगळुरू येथील ‘सेंटर फॉर एअरबोर्न सिस्टम्स’ (सीएबीएस) मध्ये आयोजित एका विशेष सोहळ्यात हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी ‘नेत्रा’ प्रणालीला अधिकृतपणे ‘एफओसी’ प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी स्वदेशी ‘नेत्रा’ प्रणाली आणि त्याच्या प्रमाणपत्राचे अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना एअर मार्शल अवधेश कुमार भारती म्हणाले, ‘‘नेत्रा प्रणालीला अंतिम मंजुरी मिळणे हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. हा केवळ स्वदेशी तंत्रज्ञान कार्यक्रमाचा कळस नसून, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने भारतीय हवाई दल आणि वैज्ञानिक समुदायाने केलेल्या यशस्वी भागीदारीचे प्रतीक आहे.’’ या प्रवासात अनेक आव्हाने आली, मात्र नावीन्यपूर्ण संशोधन, चिकाटी आणि परस्पर सहकार्यामुळे हे यश साध्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे, अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वीच हवाई दलाने या प्रणालीचा प्रत्यक्ष वापर सुरू केला होता, जो भारतीय शास्त्रज्ञ आणि उद्योगांच्या क्षमतेवर असलेला विश्वास दर्शवतो. एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे या यशाचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या भू-राजकीय परिस्थितीत ‘नेत्रा’ प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

हवाई दलाने केवळ ग्राहक म्हणून या उत्पादनाची वाट पाहिली नाही, तर आराखडा, विकास, चाचणी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) आणि सीएबीएस यांच्यासोबत हवाई दलाने खांद्याला खांदा लावून काम केले. प्रत्येक मोहिमेतून मिळालेल्या अनुभवांच्या आधारे या प्रणालीत सातत्याने सुधारणा करण्यात आल्या.
- अवधेश कुमार भारती, एअर मार्शल

आणखी सहा विमानांत बसविणार
२००४ मध्ये सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. तेव्हापासून आजपर्यंतच्या प्रवासात डीआरडीओ, हवाई दल आणि उद्योगांनी घेतलेल्या परिश्रमांचे त्यांनी कौतुक केले. आगामी काळात ‘नेत्रा’ कार्यक्रमाचा विस्तार करून आणखी सहा विमानांचा यात समावेश करण्यात येणार असून, तो प्रकल्पही यशस्वी होईल, असा विश्वास एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: मद्यपाशातून मुक्तीसाठी ५० रुग्णालयांत जनजागृती स्टॉल

टॉप थ्री वगळून ४ ते ६ नंबरच्या न्यायाधीशांची शिफारस; सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

आयआयटीत मृत्यूचे सावट! २० वर्षांत १७१ विद्यार्थ्यांची आत्महत्या, धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT