rayat shikshan sanstha
rayat shikshan sanstha Sakal
पुणे

रयत शिक्षण संस्थेचा अभिनव उपक्रम सुरू

सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या इंदापूर सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने कोरोना महामारीमुळे शाळा बंद असतानादेखील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून शिक्षक (Teachers) आपल्या दारी हा अभिनव उपक्रम सुरू केला. उपक्रमाचे पालकांमधून स्वागत होत आहे.

कोरोना मुळे मागील दीड वर्षापासून सर्व शाळा (school) बंद आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी (Student) शैक्षणिक प्रवाहातून बाहेर पडू लागले आहेत. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन अध्यापन सर्व महाराष्ट्रभर सुरू आहे. रयत शिक्षण संस्थेने ऑनलाइन शिक्षणावर सुरुवातीपासूनच भर दिला आहे.

हे सगळे खरे असले तरी अनेक विद्यार्थी स्मार्ट (smart) मोबाईल घरी नसल्याने ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत किंवा ग्रामीण भागात मोबाईल रेंज नियमित मिळत नसल्याने त्याचा प्रभाव पडत नाही. त्यामुळे गृहभेटीच्या माध्यमातून विद्यार्थी व पालक यांच्यापर्यंत पोहोचणे, विद्यार्थ्यांना गृहकार्य देऊन ते तपासणे, ऑनलाईन अध्यापनात येणारे अडथळे दूर करणे, त्यांच्या शंका जाणून घेणे यावर विद्यालयातील शिक्षकांनी भर दिला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

विद्यालयात प्रवेश असणारे विद्यार्थी हे इंदापूर शहर, वडापुरी, विठ्ठलवाडी, गलांडवाडी १ , शिंदेवस्ती, बेडशिंगे, गोखळी, तरंगवाडी, रामवाडी, पिंगळेवस्ती, वडाचेलवण,सातपुते वस्ती, सरस्वतीनगर इत्यादी ठिकाणचे आहेत .रोज एका ठिकाणी जाऊन त्या परिसरातील पालक व विद्यार्थ्यांना कोरोना नियमांचेपालन करून मंदिर किंवा प्राथमिक शाळेतबोलावले जाते. तेथे सर्व शिक्षक उपस्थित राहून विध्यार्थी व पालकांच्या सर्व समस्यासोडवतात.

गृहभेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑन लाईन शिक्षणात येणारे अडथळे दूर करता येतात, सेतु अभ्यासाचा आढावा घेता येतो तसेच ज्यांच्याकडे मोबाईल नाहीत अशा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गृहकार्य देता येते असे विद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT