Pune Traffic Updates
Pune Traffic Updates  sakal
पुणे

Pune Traffic Updates : वाघोलीतील कोंडी सोडविण्यासाठी पुणे वाहतूक उपायुक्तांची पाहणी

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : वाघोलीतील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मंगळवारी पुणे वाहतूक विभागाचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी पाहणी केली. मात्र केवळ पाहणी करून काय साध्य होणार. प्रत्यक्षात उपाययोजना होणे गरजेचे आहे. असा सूर नागरिकांमधून निघत आहे. या पूर्वी तत्कालीन उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दोन महिन्यापूर्वी तर विजय मगर यांनीही काही महिन्यांपूर्वी पाहणी केली होती.              

वाघोलीतील वाहतूक कोंडी पुणे नगर महामार्गावर प्रचंड वाढलेल्या वाहन संख्येने होत असली तरी त्यावर उपाययोजना होवू शकतात. यासाठी पुणे पोलीस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पी एम आर डी ए व महावितरण यांच्या संयुक्त निर्णय व अंमलबजावणीची गरज आहे. वाहतूक उपायुक्तांकडून पाहणी केली जाते.

समस्या जाणून घेतल्या जातात. मात्र त्यावर उपाययोजना करण्यासाठी संयुक्त बैठक घेवून निर्णय घेतला जात नाही. पुणे पोलीसांकडून अधिक मनुष्यबळ, वॉर्डन, टोईंग व्हॅन, जामर यासारख्या यंत्रणा पुरविण्याची गरज आहे. मात्र ते ही मिळत नाही. इतर विभाग तर एकमेकाकडे बोट दाखविण्याचे काम करतात. वाहतूक अडथळा ठरणारे अतिक्रमणे, विद्युत पोल हटविण्याची गरज आहे.

महामार्गावरील पाणी जाण्यासाठी पावसाळी वाहिनी योजना नसल्याने पाणी साचुन वाहतुकीला अडथळा होतो. वाहतूक नियम मोडणाऱ्यावर कडक कारवाई हा ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीची उपाययोजना आहे. स्कूल बसेस, कंपनी बसेस एका वेळी महामार्गावर येणार नाही हा ही उपाययोजनेचा भाग आहे.  अनाधिकृत असलेले फ्लेक्स रस्त्यावर पडून वाहतुकीला अडथळा होतो.

नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने पुणे नगर रोड वर होर्डिंग पडून चार तास वाहतूक ठप्प झाल्याचा प्रकारही घडला. डीपी रस्ते विकसित केल्यास त्यातूनही वाहतूक कोंडी कमी होईल. वाघोलीतील वाहतूक कोंडीचा फटका अनुभवणारे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही वाहतूक कोंडीचे गांभीर्य लक्षात आले आहे. यामुळे त्यांच्या स्तरावर सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेवून तात्काळ निर्णायक अंमलबजावणी केल्यास कोंडी नक्की कमी होईल. केवळ वाहतूक विभागाने पाहणी करून कोंडी कमी होणार नाही. अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. पाहणी वेळी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे, लोणीकंद वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, समाजसेवक उपस्थित होते.

वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दृष्टीने पाहणी केली आहे. पी एम आर डी ए अधिकाऱ्यांची बैठक घेवून यावर काय उपाययोजना शक्य आहे. त्याचा आढावा घेवू. अन्य विभागाची गरज भासल्यास पुणे पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीत इतर सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेवून निर्णय घ्यावा लागेल.

रोहिदास पवार, उपायुक्त, पुणे वाहतूक विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: "विक्रमी संख्येने मतदान करा," पंतप्रधान मोदींचे मराठीतून आवाहन

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

SCROLL FOR NEXT