Amruta-Gurav 
पुणे

शैक्षणिक क्षेत्रातून समाजसेवेचा ध्यास

ज्ञानेश्‍वर गुरव (गुरुजी)

वकिलीच्या व्यवसायातून अनेकांच्या शैक्षणिक, सामाजिक संस्था स्थापन करून देतादेता मुलींच्या शिक्षणासाठी स्वतःच शाळा सुरू करावी, असे ॲड. अमृता गुरव यांच्या मनात आले अन्‌ आर्थिक बळ नसताना केवळ आई-वडिलांच्या भक्कम पाठिंब्यावर शाळाच नव्हे; तर शैक्षणिक संकुलच उभारले.

ॲड. अमृता ज्ञानेश्वर गुरव, खेड तालुक्‍याच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अग्रगण्य नाव. कोणताही राजकीय वारसा किंवा आधार नसताना स्वकर्तृत्वाच्या बळावर तरुणवयात आपले राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात स्थान निर्माण करणारे महिला नेतृत्व. वकिली व्यवसायातून दुसऱ्यांना शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक संस्था सुरू करून देत असतानाच मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊन तो प्रत्यक्षात आणला. केवळ शाळाच नव्हे; तर शैक्षणिक संकुलच उभारले.

अतिशय कमी वयात खेड पंचायत समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अशा या तडफदार व सर्वगुणसंपन्न महिला नेतृत्वाचा आदर्श घेऊन तरुणाई त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहे. 

अमृता गुरव यांचा शिक्षक दांपत्याच्या कुटुंबात जन्म झाला. सगळ्या भावंडांमध्ये वडिलांची लाडकी मुलगी. पहिलीपासून सातवीपर्यंत आई जयश्री गुरव याच वर्गशिक्षिका असल्याने शैक्षणिक व सर्वांगीण प्रगती उत्तम झाली. त्यांनी कायद्याचे उच्च शिक्षण घ्यावे, अशी आई-वडिलांची इच्छा होती.

आईबरोबर पुण्यात येऊन नामांकित आयएलएस विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. सन २००६ मध्ये वडिलांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयात वकिली व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक विश्वस्तांशी संपर्क आला. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, डी. एड., बी. एड महाविद्यालयांना शासकीय परवाने मिळवून दिले. हे करत असताना ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी काम करायचे, असा निश्‍चय केला. त्यासाठी ग्रामीण भागात शाळा काढण्याचे ठरवले. सन २०१० मध्ये ७९ मुलींना घेऊन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कन्याशाळा राजगुरुनगर येथे सुरू केली. दुसऱ्या वर्षी विद्यार्थिनींची संख्या वाढली.

शाळेतील भौतिक सुविधांसाठी आई-वडील भक्कमपणे पाठीमागे उभे राहिले. आई सौ. जयश्री व वडील ज्ञानेश्वर भाऊराव गुरव-गुरुजी यांनी स्वतःच्या आयुष्यभराची सर्व पुंजी शाळेच्या कामासाठी लावली. 

त्यानंतर पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा स्थापन करून लक्ष्मी विद्या भवन हे शैक्षणिक संकुल उभे केले. सध्या या संकुलात ज्ञानज्योती फातिमाबी शिशू शाळा (पूर्व प्राथमिक), क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कन्याशाळा (प्राथमिक), राजमाता जिजाऊ कन्याशाळा (माध्यमिक) आदींचा समावेश आहे. कोणतेही राजकीय व आर्थिक पाठबळ नसताना केवळ आई-वडिलांच्या पाठबळावर आणि जिद्दीवर हे शैक्षणिक संकुल राजगुरुनगर येथे उभे केले. या शाळांमध्ये मराठी माध्यमाबरोबरच सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या कन्याशाळा सुरू केल्या. ग्रामीण भागातील मुली इंग्रजी शिक्षणात कमी पडू नये, यासाठी आयसीएससी बोर्डाचे डी. जे. केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल सुरू केले. पालकांच्या मागणीनुसार २०१४ या वर्षी डी. जे. केंब्रिज स्कूल या नावाने मुलांसाठी सेमी इंग्रजी शाळा सुरू केली. आकुर्डी (पुणे) येथे सीबीएसई बोर्डाचे इंग्रजी माध्यमाचे ऑर्किड द इंटरनॅशनल स्कूल २०१६ मध्ये सुरू केले. 

गरिबांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामाची पावती २०१२ मध्ये झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत मिळाली. शिवसेनेकडून लढताना खेड पंचायत समितीच्या सदस्यपदी भरघोस मतांनी निवडून आल्या. राजकीय प्रवास जरी सुरू असला तरी त्याचा शैक्षणिक कार्याला अडसर ठरणार नाही, याची काळजी घेत शैक्षणिक क्षेत्रातील काम दिवसेंदिवस वाढवत नेले. राजगुरुनगर येथील लक्ष्मी विद्या भवन या शैक्षणिक संकुलात आज अकराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; तर आकुर्डीच्या शाळेत सुमारे पंधराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राजगुरुनगर येथील शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुली या गरीब शेतकरी कुटुंबांतील आहेत. त्यांना संस्थेमार्फत मोफत शिक्षण दिले जाते. संस्थेतर्फे वह्या, पुस्तके, स्कूल बॅग, टिफिन बॅग, गणवेश मोफत दिले जातात. ग्रामीण भागातील गरीब, गरजू, हुशार, अभ्यासू मुलींच्या मोफत शिक्षणासाठी व सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा त्यांचा मानस आहे. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागू नये, यासाठी शैक्षणिक सुविधा घराजवळ उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यात काम करण्याची अमृताताईंची इच्छा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaiwal : निलेश घायवळ स्विर्झलंडमध्ये; ९० दिवसांचा मिळवला व्हिसा

lioness guard VIDEO : नवरात्रोत्सवात देवीच्या मंदिरासमोर चक्क सिंहिणीचा पहारा!

IND vs WI: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विंडीजला आणखी दुसरा मोठा धक्का; टीममध्ये केला बदल

२ तारखेला सोलापूर शहरातील वाहतूक मार्गात बदल! विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनी पारंपारिक वाद्याच्या गजरात निघणार मिरवणुका; ‘डीजे’ला बंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश

Career Horoscope 30th Sept: उद्या गजकेसरी राजयोग! मान-सन्मान आणि यशाची दारे उघडणार; 'या' राशींचे करिअर झेपावणार

SCROLL FOR NEXT