Seema-Khinvasara
Seema-Khinvasara 
पुणे

मुलीचा जन्म प्रतिष्ठित करण्याचा ध्यास

डॉ. सीमा सुनील खिंवसरा

माझ्या अंतः प्रेरणांना अनुसरून जगत असताना रूढी, परंपरा, रीतिरिवाज यांचा अडथळा निर्माण झाला नाही. ज्या मूलभूत चैतन्यामुळे जीवनाचा खेळ सुरू आहे, ते सर्व भेदांच्या पलीकडले आहे. मनात उठणारी विचारांची वादळं शांत करण्यासाठी व्यासपीठे माझ्याकडे चालून आली.

हुतात्मा बाबू गेनू यांचे जन्मगाव असलेल्या महाळुंगे पडवळ गावचे मूळ रहिवासी असल्याचा मला गर्व आहे. वडील यादवराव पडवळ यांच्या निर्भय वृत्तीचा, आजोबा आबासाहेब पडवळ यांच्या पुरोगामी विचारसरणीचा, काकू छायाताई पडवळ यांच्या मानवतावादी दृष्टिकोनाचा प्रभाव माझ्या जडणघडणीवर आहे. बी. जे. मेडिकल कॉलेज (पुणे) येथून एम. बी. बी. एस., डी.जी.ओ. पदवी प्राप्त केली. त्यानंतर गेल्या २५ वर्षांपासून मंचर येथे ‘प्रांजल हॉस्पिटल’च्या माध्यमातून सेवा देत आहे. ग्रामीण भागात मूलभूत सुविधांची कमतरता असताना अत्यवस्थ गर्भवती माता व बालकांचे प्राण वाचविण्यासाठी आव्हाने स्वीकारली. बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील खिंवसरा यांचे अमूल्य सहकार्य लाभले. मी इंडियन मेडिकल असोसिएशन-शिवनेरीची विद्यमान उपाध्यक्ष असून, आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशनची पहिली अध्यक्ष होते.

मी आंबेगाव विकास गटातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर सुरक्षित मातृत्व योजना, महिलांच्या गर्भाशय व स्तनाच्या कर्करोग निदान शिबिरांतून अनेक वर्षे सातत्याने मोफत तज्ज्ञसेवा दिली. त्याचा आदिवासी दुर्गम भागातील हजारो गरीब व गरजू रुग्णांना लाभ झाला. मातामृत्यू व बालमृत्यूदर कमी होण्यासाठी शासनास सहकार्य केले. डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाने माझी विभागीय स्तरावर पुणे मंडळांतर्गत माता व बालकांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट कामगिरीबाबत निवड व नामांकन केले. शाळा, महाविद्यालयांमध्ये ॲनिमिया, कुपोषण निर्मूलन, पौगंडावस्थेतील बदलाबाबत मी समुपदेशन केले. स्त्रीजन्मदर वाढविण्यासाठी उपाययोजना, पाणीपुरवठा नियोजन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन याबाबत मंचर ग्रामसभेत प्रस्ताव मांडले. महाराष्ट्र आरोग्य पत्रिका, वर्तमानपत्रे, वैद्यकीय परिषद स्मरणिका यातून आरोग्यविषयक माहितीपूर्ण व सामाजिक भान व्यक्त करणारे चिंतनपर स्फूटलेखन  केले. नॅशनल एड्‌स रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या एड्‌स प्रतिबंधात्मक उपक्रमात सहभाग घेतला.

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी समाजप्रबोधन अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण, हा स्त्रीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. ही स्त्रीची आत्मसन्मानासाठी स्वतःशीच लढाई आहे. त्यामुळे मुली आणि महिलांचा आत्मसन्मान जागृत करणे, हाच स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याचा प्रभावी उपाय आहे. हा ठाम विचार मी मांडला.

लेक वाचवा मोहीम
‘मुलगाच हवा’ ही मानसिकता बदलण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, शासकीय स्तरावर, ग्रामसभा, गर्भलिंग निवड प्रतिबंध कार्यशाळांतून मुली व महिलांचा स्वाभिमान जागृत केला. रितीरिवाजांच्या घट्ट समीकरणांना प्रश्न विचारणाऱ्या, परंपरांची नवीन गणितं मांडणाऱ्या स्वतंत्र बुद्धीचा पुरस्कार केला. ‘सावित्रीच्या लेकी’ या आईवडिलांची म्हातारपणची काठी असतात. हा विश्वास समाजमनात प्रस्थापित केला.

लेक वाचवा मोहीम ही सकारात्मक समाज परिवर्तनाची चळवळ आहे. आत्मसन्मान गमावून स्वतःच्या वैरी होऊ नका, मुलीचा जन्म प्रतिष्ठित करा, ‘लेक वाचवा मोहीम’च्या सशक्त शिलेदार व्हा, असे आवाहन केले.

विविध पुरस्कारांनी गौरव
समाजहितासाठी अनुकरणीय कामगिरी, सामाजिक प्रश्नांबाबत संवेदनशीलता, वैद्यकीय पेशाच्या विश्वासाहर्ततेची जपणूक या निकषांवर उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश डॉ. एस्‌. राधाकृष्णन समितीने माझी ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ॲवॉर्ड २०१५’साठी निवड केली. नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, पुणे ऑबस्टेट्रिक अँड गायनिकॉलॉजिकल सोसायटीने किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्यासाठी उल्लेखनीय कामाबाबत ‘डॉ. स्मिता जोग ॲवॉर्ड’, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्याने ‘प्रेसिडेंट्‌स ॲप्रिसिएशन ॲवॉर्ड’, संस्कार समूहाने जागतिक महिला दिनानिमित्त ‘विशेष गौरव पुरस्कार’, श्री कान्होबा सार्वजनिक वाचनालयाने ‘समाजरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT