inspiring story of Ujwala Shinde Ujwala Sawant have succeeded competitive examination junnar Sakal
पुणे

Success Story : शेतकरी कुटुंबातील दोन उज्वलांचे स्पर्धा परीक्षेत उज्वल यश

जुन्नर तालुक्यातील उदापुर येथील उज्वला शिंदे व सोमतवाडी येथील उज्वला सावंत यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविले आहे.

दत्ता म्हसकर

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील उदापुर येथील उज्वला शिंदे व सोमतवाडी येथील उज्वला सावंत यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविले आहे. शिंदे हिची नगर परिषदेत राज्यसेवा अंतर्गत लेखापरीक्षक व लेखासेवा यापदी निवड झाली आहे तर सावंत हिची नागपूर वनविभागात वनरक्षक पदी निवड झाली आहे.

दोघी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. दोघीही येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी आहेत.

स्पर्धा परीक्षेत कठोर परिश्रम व चिकाटीने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय काळे यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे,उपप्राचार्य,प्राध्यापक,प्रबंधक व विद्यार्थी उपस्थित होते.

उज्वला शिंदे ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून महाविद्यालयात पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. आई व वडील नसताना आजी लक्ष्मीबाई यांनी आपल्या नातीचा कठिण परिस्थितीत उत्तम संस्कार देऊन सांभाळ केला व तिला चांगले एम.कॉम पर्यत शिक्षण दिले. गेल्यावर्षी आजी लक्ष्मीबाईचे निधन झाले तरी अशा परिस्थितीत न डगमगता उज्वला हिने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास चालु ठेवला व यश संपादन केले.

उज्वला सावंत महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. अनेक अडचणींना सामोरे जात व प्रामाणिक पणे प्रयत्न करीत नागपूर वनविभागात वनरक्षक या पदावर तिची निवड झाली आहे.

दोन्ही उज्वलांच्या उज्वल यशामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील असंख्य विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला नक्कीच नवे बळ मिळेल असा विश्वास ॲड संजय काळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

'माझी आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय काळे यांनी माझे महाविद्यालयाचे शुल्क सलग तीन वर्ष माफ केले. प्राचार्य प्राध्यापकांनी तसेच माझ्या आजीने मला उत्तम संस्कार देऊन घडविले. अनेक वेळा अपयश येवून ही मी प्रामाणिकपणे अभ्यास केला व यश मिळविले '

- उज्वला शिंदे,लेखापरीक्षक

'ग्रामीण व आदिवासी भागातील मुले कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या कष्टाने विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन करतात. ही अभिमानाची बाब आहे.एनसीसी व एनएसएस मधून अनेक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास घडत आहे. त्यामुळे ते विविध क्षेत्रात यशस्वी होतात.

- ॲड संजय काळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT