जुन्नर (पुणे) : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रोजगार हमीची कामे लवकर सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेला सूचना केली होती. जुन्नर तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाल्याने स्थानिक १७० मजुरांच्या हातास काम मिळाले आहे.
कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने गावात रोजगाराच्या संधी नव्हत्या, तर वाहतुकीच्या सुविधा बंद असल्याने स्थानिक मजुरांना कामासाठी अन्य ठिकाणी जाता येत नव्हते. त्यामुळे गेले दोन महिने मजूर घरात बसून होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रोजगार हमीची कामे लवकर सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेला सूचना केली होती. तांबे येथे शुक्रवारपासून रोजगार हमी योजनेंतर्गत पहिले काम सुरू झाले आहे. या कामाचे उद्घाटन सरपंच कविता मडके यांच्या हस्ते करण्यात आले.
तालुक्यातील विविध गावाच्या बारा घरकुलाच्या कामावर ७० मजूर काम करीत आहेत. वृक्ष संगोपनाच्या एका कामावर एक, तर वृक्ष लागवडीच्या एका कामावर ४५, अशा पंचायत समितीच्या एकूण १४ कामावर ११६ मजूर काम करत आहेत. तांबे, औरंगपूर व हिवरे बुद्रुक या ग्रामपंचायतीअंतर्गत कामे सुरू आहेत. ओतूर येथील रस्त्याचे व तलावातील गाळ काढण्याच्या कामांना मंजुरी असून, ही कामे लवकरच सुरू होणार असल्याचे गटविकास अधिकारी हेमंत गरिबे यांनी सांगितले. तसेच, सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांची दोन कामे सुरू असून, त्यावर ४० मजूर काम करत आहेत. कृषी विभागाच्या फळबाग योजनेंतर्गत एक काम सुरू असून, त्यावर १४ मजूर काम करत आहेत.
तांबे येथील रोजगार हमी योजनेच्या कामासाठी मे महिन्यापासून प्रयत्न केले होते. कामाला मंजुरी मिळविणे, काम मागणीचे फॉर्म भरून घेणे, या कामाचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अॅड. ललित जोशी, किसान सभेचे डॉ. अमोल वाघमारे, व सोपेकॉम संस्थेचे किरण लोहकरे यांनी प्रशासनाकडे केला होता. त्यास यश आले आणि शेतमजुरांना गावात काम उपलब्ध झाले आहे.
या कामांच्या मंजुरीसाठी सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, रोजगार हमी योजनेचे विभागीय उपायुक्त विनयकुमार आवटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर व माने, एमकेसीएलचे विनायक कदम यांची खूप मदत झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.