Insurance-Premium
Insurance-Premium 
पुणे

#InsurancePremium वैयक्तिक अपघात विमाही महाग!

मंगेश कोळपकर

पुणे - दुचाकी अथवा चारचाकी जुन्या वाहनाच्या विम्याचे नूतनीकरण करायला गेलात, तर त्यातील वैयक्तिक अपघात विम्याच्या प्रीमिअममध्ये तब्बल ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. पूर्वी हा विमा प्रति वर्षासाठी १०० रुपयांत उपलब्ध होता. आता त्याला ८४० रुपये खर्च येणार आहे. २९ सप्टेंबरपासून विमा कंपन्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. 

वाहनाच्या विम्याचे नूतनीकरण करताना त्यातील वैयक्तिक अपघात विमा पॉलिसीत या पूर्वी १०० रुपयांत २ लाख रुपयांचे सुरक्षाकवच होते. आता हे कवच १५ लाख रुपये सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे करांसहित ही रक्कम आता ८४० रुपयांवर पोचली आहे. चालकाच्या नावावर असलेल्या प्रत्येक वाहनासाठी ही पॉलिसी बंधनकारक आहे. तसेच थर्ड पार्टी विम्यासाठीच्या हप्त्याची रक्कमही वाढली आहे. नवे वाहन खरेदी करताना दुचाकीसाठी पाच, तर चारचाकी वाहनांसाठी तीन वर्षे विमा सुरवातीलाच काढणेही बंधनकारक केले आहे. त्यामुळे एकूण विम्याचा खर्च वाढल्यामुळे वाहन खरेदीही महाग झाली आहे. एका नागरिकाने फॉरच्युनर गाडी खरेदी केली. तीन वर्षांचा विमा, थर्ड पार्टी विमा, वैयक्तिक अपघात विमा असा त्याचा एकूण खर्च तीन लाख ६५ हजार रुपयांवर पोचला. यापूर्वी हा खर्च एक लाखाच्या आसपास होता.

प्रति वाहन खर्च १०० वरून आता ८४० रुपये

विमा कवच वाढविले आहे, हे एका अर्थाने योग्य आहे. परंतु ग्राहक विविध प्रकारचा विमा काढतच असतो. आता सक्ती केली आहे म्हणून पर्याय नाही. व्यवसाय आहे तेवढाच आहे, मात्र खर्च आता ८ रुपयांवरून १२ रुपये झाला आहे. हा खर्च नफ्यातून करावा लागणार आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसला आहे. 
- गणेश फिरंगे, डंपर व्यावसायिक

नियमांचे पालन करणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना हा भुर्दंड आहे. वाहनाच्या एकूणच विम्याची रक्कमही वाढली आहे. एखाद्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावर चार गाड्या असतील, तर वैयक्तिक अपघात विम्याच्या त्याला चार पॉलिसी काढाव्या लागणार आहेत. १०० रुपयांवरून हा खर्च आता ८४० रुपयांवर गेला आहे. 
- किशोर मेहता, विमा प्रतिनिधी

वाहनाच्या विम्याचे नूतनीकरण करताना वैयक्तिक अपघात विमा कवच दोन लाख रुपयांवरून १५ लाख रुपये करावे, असा आदेश चेन्नई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्या नुसार विमा कंपन्यांकडून या निर्णयाची अंमलबजावणी २८ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. वाहनचालक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या फायद्यासाठीच हा निर्णय आहे.
- एम. के. वैद्य , जनसंपर्क अधिकारी, युनायटेड इन्श्‍युरन्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT