नवी दिल्ली, ता. १२ (पीटीआय) : ‘‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स (आयबीसीए) सर्वोत्तम पद्धती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करणे अनिवार्य तर करेलच; पण त्याचसोबत ते सदस्य देशांना केवळ मोठे हिंस्र प्राणी नव्हे, तर त्यांच्या शिकारी प्राण्यांचीही ओळख करून देण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मदत करील,’’ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.
‘पीटीआय व्हिडिओ’ला दिलेल्या मुलाखतीत ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’चे महासंचालक एस. पी. यादव यांनी संस्थेमार्फत ‘बिग कॅट’ प्राण्यांच्या स्थलांतराचे उदाहरण दिले. त्यांनी सांगितले की, कंबोडियाने वाघांच्या पुनर्वसनासाठी आधीच मदत मागितली आहे. भारत सरकार; तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यावर काम करत आहेत.
‘‘आयबीसीए सदस्य देशांना केवळ बिग कॅट प्राण्यांच्या नव्हे तर त्यांच्या भक्ष्य प्रजातींचे स्थलांतर करण्यास मदत करेल. कंबोडियाशिवाय कझाकस्ताननेदेखील निरीक्षण आणि मार्गदर्शनाची मदत मागितली आहे. अनेक देश पुनर्वसनात रस दाखवत असल्याने आयबीसीए या प्रक्रियेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध आहे,’’ असे यादव यांनी सांगितले.
‘‘बिग कॅट प्राण्यांवर आधारित एक समर्पित ज्ञानमंच तयार केला जात असून, त्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक ॲप विकसित केले जात आहे. संबंधित देशांच्या प्रश्नांना माहिती देऊन हे उत्तर देईल,’’ असे यादव यांनी सांगितले. प्राण्यांच्या संवर्धनात समुदायाच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करून यादव यांनी यांनी व्याघ्र अभयारण्यांच्या परिसरातील व्यापक गरिबीकडे लक्ष वेधले. तिथे रोजगाराच्या संधी आणि उद्योगांची कमतरता आहे. संवर्धन हे या समुदायांसाठी रोजगार आणि उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. स्थानिक लोक गस्त घालणे, अधिवास संवर्धन, व्यवस्थापन आणि संबंधित कामांमध्ये सहभागी असतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मानवी वस्त्यांत शिरकाव
‘बिग कॅट’ प्राण्यांच्या मानवी वस्त्यांमध्ये शिरकावाच्या घटनांबद्दल आणि त्यातून त्यांच्या अधिवासाच्या स्थितीबद्दल काय सूचित होते, असे विचारले असता, यादव यांनी मान्य केले की भारत, नेपाळ आणि बांगलादेशसारख्या देशांसाठी; तसेच ब्राझील आणि अमेझॉन प्रदेशातील सिंहांसाठी या प्राण्यांचे भटकणे ही एक मोठी समस्या आहे. ‘‘तंत्रज्ञानाचा वापर, पूर्वसूचना प्रणाली, योग्य नुकसानभरपाई यंत्रणा आणि स्थानिक समुदायांमध्ये शिक्षण यांच्या मदतीने या समस्येचे प्रभावी व्यवस्थापन करता येऊ शकते,’’ असे यादव म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.