International-School
International-School 
पुणे

‘इंटरनॅशनल स्कूल’ची ‘क्रेझ’

अवधूत कुलकर्णी

पिंपरी - सर्वच क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे पालकांमध्ये मुलांसाठी ‘इंटरनॅशनल स्कूल’ची ‘क्रेझ’ वाढत आहे. त्यातच यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शहरात चार आंतरराष्ट्रीय शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शाळांची संख्या २४ वर जाणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध होणार आहेत. 

प्राधिकरणात एक, चिंचवड स्टेशन येथे एक तर मोशीत दोन नवीन शाळा सुरू होणार आहे. सध्या शहरात सीबीएसईसारखे अभ्यासक्रम राबविणाऱ्या दोन खासगी राष्ट्रीय शाळा आहेत. या व्यतिरिक्त २०१ इंग्रजी माध्यमाच्या कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या शाळा आहेत. सरकारची जागा मात्र अनुदान नसलेल्या बारा शाळा आहेत. या व्यतिरिक्त महापालिकेच्या १०५ शाळा आहेत. केवळ नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या शाळा असलेल्या शहराचे रूप गेल्या १५ ते २० वर्षांत पालटले आहे. मातीच्या भिंती, पत्र्याचे छत असलेल्या शाळांची जागा आता चकाचक आंतरराष्ट्रीय शाळा घेत आहेत. 

आंतरराष्ट्रीय शाळा म्हणजे काय?    
इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून केंब्रिज विद्यापीठासारख्या आंतरराष्ट्रीय परीक्षांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम असलेले शिक्षण मुलांना मिळते. त्यामुळे पालक या शाळांकडे आकर्षित होतात. काही आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील सीबीएसई अभ्यासक्रम राबविण्यात येतो. 

शाळा सुरू करण्याची पद्धत
शाळा कशी सुरू करण्याबाबत सल्लासेवा देणाऱ्या कंपन्याही आहेत. या कंपन्या अशी शाळा सुरू करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, नगरपालिका, महापालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून लागणारे परवानग्या मिळवून देण्याचे काम करतात. 

शाळेच्या नावात ‘इंटरनॅशनल’ असा शब्द वापरणाऱ्या शाळांकडून प्रत्येक विद्यार्थ्यामागे वर्षाला ५० हजार रुपयांपासून ते अगदी दोन लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येते.

शाळा वाढण्याची कारणे
शहराच्या परिसरात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांसह परिसरातील विविध उत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये शिक्षण घेऊन पुढे उच्चशिक्षण घेतल्यावर मुलाला लगेच चांगली नोकरी मिळेल, असे वाटते. त्यामुळेही या शाळांची संख्या वाढलेली दिसते. या संदर्भात महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे म्हणाले, ‘‘खासगी आंतरराष्ट्रीय शाळांपैकी काही शाळांमध्ये राष्ट्रीय पातळीवरील सीबीएसई तर काही शाळांमध्ये इंग्लंडमधील केंब्रिजचा अभ्यासक्रम शिकविण्यात येतो. पालकांनी अशा शाळांमध्ये त्यांच्या मुलांना प्रवेश घेताना शिक्षणाच्या दर्जाची पूर्ण माहिती घ्यावी.’

आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये प्रात्यक्षिक अनुभवावर आधारित शिक्षणावर जास्त भर दिलेला असतो. पालकांनी संबंधित शाळा आंतरराष्ट्रीय असल्याची खात्री करूनच तेथे मुलांना प्रवेश घ्यावा. शाळेच्या नावात ‘इंटरनॅशनल’ असा शब्द पाहून अनेक पालक मुलांना अशा शाळांमध्ये प्रवेश घेतात. 
- राजेंद्र सिंग, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र इंडिपेंडंट करिकुलम इंग्लिश स्कूल असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Collection: जीएसटीने रचला इतिहास! पहिल्यांदाच कलेक्शन 2 लाख कोटींच्या पुढे; सरकार मालामाल

Latest Marathi News Live Update: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

Bahubali: Crown Of Blood : "बाहुबली परत येतोय" ; एसएस राजामौली यांनी केली नव्या सिरीजची घोषणा

T20 World Cup 2024 All Teams Squad : भारत, पाकिस्तान, इंग्लंडसह सर्व 20 संघांचा 'स्क्वाड'! जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

Satara Lok Sabha : 'साताऱ्याचा खासदार शशिकांत शिंदेच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ'; जयंत पाटलांना विश्वास

SCROLL FOR NEXT