स. प. महाविद्यालय - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारी आयोजित केलेल्या योग प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी.
स. प. महाविद्यालय - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारी आयोजित केलेल्या योग प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी. 
पुणे

International Yoga Day 2019 : विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे धडे

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिक्षण प्रसार मंडळी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया, वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्‌स स्टुडंट्‌स असोसिएशन (विकासा) आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रमात शेकडो विद्यार्थी, शिक्षक व सीए सहभागी झाले होते. उत्स्फूर्त वातावरणात विद्यार्थ्यांनी योगाचे धडे घेतले.

या वेळी शि. प्र. मंडळीचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, प्राचार्य दिलीप शेठ, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियाच्या अध्यक्षा ऋता चितळे, उपाध्यक्ष अभिषेक धामणे आदी मान्यवर उपस्थित होते. शि. प्र. मंडळी संचालित सर्व शाळांचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. पतंजली योग 
समितीचे प्रीतेश केले यांनी योग प्रात्यक्षिके करून घेतली. 

‘आयसीएआय’च्या वतीने सीए, विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी फडके संकुल येथे योगवर्गाचे आयोजन केले होते. हा योगवर्ग ३० जूनपर्यंत चालणार असल्याचे धामणे यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांचा सहभाग
बी.जे. महाविद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योगाभ्यास केला.   विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसीलदार प्रशांत आवटी, शिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव मोरे, ऑलिम्पियन मनोज पिंगळे, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांसह नागरिक उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग परीक्षक हेमा शहा यांनी योगाभ्यासाची माहिती दिली. व्यासपीठावर स्कूल ऑफ योगा ॲण्ड रिसर्च सेंटरच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके दाखविली. उपसंचालक अनिल चोरमले यांनी स्वागत केले. तर जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी आभार मानले.

‘योग-संगीताचे नाते’
योग आणि संगीताचे नाते अतूट आहे, असे मत ज्येष्ठ बासरीवादक केशवराव दिंडे यांनी व्यक्त केले. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत संगीत दिनानिमित्त वाद्य पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी दिंडे यांनी बासरीचे विविध प्रकार आणि त्यांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाला शाला समितीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी, पर्यवेक्षिका रजनी कोलते आदी उपस्थित होते. 

एमआयटीत शिबिर 
लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठात योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. सुनील राय, कुलसचिव शिवशरण माळी, सुनीता कराड, प्रा. पद्माकर फड, डॉ. वसंत पवार, नानासाहेब लोखंडे आदी उपस्थित होते.

कारागृहात उत्साहात 
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी योग दिन कार्यक्रम घेण्यात आला. अतिरिक्‍त पोलिस महासंचालक (कारागृह व सुधार सेवा) सुनील रामानंद, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार या वेळी उपस्थित होते. सूर्या फाउंडेशन, योग प्रशिक्षक विश्‍वास पानसरे आणि श्रीवंत नंदनवर यांनी बंदीजनांना योगाबाबत मार्गदर्शन केले. योगसाधना ही केवळ एक दिवसासाठी नसून सर्वांनी नियमित करावी, असे आवाहन अतिरिक्‍त पोलिस महासंचालक रामानंद यांनी केले. कारागृह उपअधीक्षक सी. ए. इंदूरकर, सत्यवान हिंगमिरे, एन. एस. क्षीरसागर, डी. एच. खरात, संजय मयेकर यांच्यासह अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते.

सामूहिक सूर्यनमस्कार
ब्रह्ममुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्रातर्फे तळजाई पठारावर आंतरराष्ट्रीय योग दिन सामूहिक सूर्यनमस्कारातून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यात केंद्राच्या ६०० साधकांनी प्रत्येकी ५० असे एकत्रित ३० हजार सूर्यनमस्कार घातले.  योगगुरू दीपकजी यांनी या वेळी मार्गदर्शन केले. केंद्राच्या अध्यक्षा अश्‍विनी पासलकर, नगरसेविका रूपाली धाडवे, सुभाष जगताप या वेळी उपस्थित होते. केंद्राचे पुण्यामधील महात्मा फुले सभागृह (वानवडी), विद्याविकास सभागृह (सहकारनगर), शरद पवार बहुद्देशीय भवन (धनकवडी), माऊली गार्डन (कात्रज) येथील वर्गातील साधक सहभागी झाले होते. 

कॉसमॉस बॅंकेत उपक्रम
कॉसमॉस बॅंकेच्या शाखांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी सूर्य नमस्कार आणि योग साधना कार्यक्रमाचे आयोजन केले. सचिन पानसे आणि सागर कुलकर्णी यांनी योग प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, ज्येष्ठ संचालक कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते.

जगभर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. आपले आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी, स्मरणशक्ती वाढण्यासाठी रोज योगा केला पाहिजे. आजचा दिवस त्यासाठी प्रोत्साहित करीत असतो. 
- ॲड. एस. के. जैन, अध्यक्ष, शि. प्र. मंडळी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT