पुणे

इंदापुरात ‘पतंजली’ तर्फे योग दिनाचे कार्यक्रम

CD

इंदापूर, ता. २६ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पतंजली योग समितीच्या वतीने इंदापूर तालुक्यात ८३ ठिकाणी आयोजित शिबिरांमध्ये ८३ हजार ५९८ विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जनसहभागातून तालुक्यात योग दिन साजरा करण्यात आला.
पतंजली योग समितीचे तहसील प्रभारी दत्तात्रेय अनपट यांच्या मार्गदर्शनाखाली २२ वर्षांपासून तालुक्यात निःशुल्क योगसेवा सुरू आहे. यंदाच्या योग दिनानिमित्त तालुक्यातील शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने विविध ठिकाणी योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पतंजलीच्या योगशिक्षकांनी २६ हजार ५९८ नागरिकांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिके देऊन योगाचे महत्त्व पटवून दिले.
या मोहिमेत इंदापूर शहरासह कालठण क्र. १, गलांडवाडी क्र. २, शिरसोडी आणि कळाशी येथील योगवर्गांनी सक्रिय सहभाग घेतला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी महिला पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, किसान सेवा समिती, युवा भारत आणि सोशल मीडिया विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटच्या दिवशी PM मोदी आणि शहा आले, ४ मिनिटात कामकाज आटोपले; लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब

Shaktipeeth Highway Protest : जयंत पाटील, राजू शेट्टी एकत्र! 'शक्तिपीठ' रद्द करण्यासाठी सांगलीत मोठ्या आंदोलनाची घोषणा; 31 गावांतील 3 हजार एकरांहून अधिक जमीन बाधित

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

Independence Day 2026: तिरंगा थीमवर सजवा घर, शाळा अन् ऑफिस! १५ ऑगस्टला नक्की ट्राय करा 'या' भन्नाट डेकोरेशन आयडियाज!

Latest Marathi News Live Update : पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे अत्यंत अहंकारी वर्तन- कॉंग्रेस

SCROLL FOR NEXT