पुणे

नवीन मराठी शाळा योग दिन

CD

नवीन मराठी शाळेत योग दिन
सातारा, ता. २६ : येथील नवीन मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. मंगल साळुंखे यांनी योग दिनाविषयी माहिती दिली. योगामुळे शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्य सुदृढ राहते, तसेच दैनंदिन जीवनात सकारात्मकता वाढते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विविध योगासने, प्राणायाम, तसेच ध्यानधारणा यांचा सराव केला. ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन यांसह विविध योगप्रकारांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
शालाप्रमुख तनुजा तिकोने यांनी मनोगत व्यक्त केले. योग ही भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असून, निरोगी जीवनासाठी नियमित योगाभ्यास आवश्यक असल्याचे नमूद केले. या वेळी ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती चव्हाण, क्रीडाप्रमुख मंगल साळुंखे, सारिका लामकाने आदी उपस्थित होते.

PNE26W28988
सातारा ः आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासनाचे धडे गिरविताना नवीन मराठी शाळेचे विद्यार्थी.

---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आता रेस्टॉरंटमध्ये बाटलीबंद पाणी खरेदीची सक्ती नाही; FDA कडून आदेश लागू, नवीन नियम नेमके काय आहेत?

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीला का नाही खेळवले? श्रेयस अय्यर बघा काय म्हणाला; आमच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत अन्...

Mahanagar Gas Limited: 90 दिवसांत PNG घ्या, नाहीतर LPG बंद! मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीचे पदार्पण झाले का? श्रेयस अय्यरच्या निर्णयाने सारे चकीत... पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

धर्मांतर केल्याने मुस्लिम आरक्षणाचा हक्क मिळत नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, सरकारी आदेश घटनाबाह्य ठरवला

SCROLL FOR NEXT