पुणे

भगवान जगन्नाथ स्नान यात्रा

CD

PNE26W29831 - इस्कॉन व्रजधाम मंदिरतील श्री राधादामोदर

इस्कॉन मंदिरात आज देवस्नान पौर्णिमा
दही-चिडा महोत्सव; देवस्नानानंतर ‘अनवसरण’ काळ प्रारंभ; रथयात्रा २२ जुलैला
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २७ : अक्कलकोट रोडवरील इस्कॉन मंदिरात रविवारी (ता. २८) भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या देवस्नान पौर्णिमा सोहळ्याचे आयोजन केले आहे. देवस्नान, दही-चिडा महोत्सव, कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसाद यामुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघणार आहे.
सकाळी ८ ते ११ या वेळेत पारंपरिक वैदिक पद्धतीने देवस्नान सोहळा होणार आहे. या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे भगवानांसाठी लागणारी शाल व कानटोपी सोलापूरातील भाविक विणतात. त्यासाठी लागणारे विशेष सूत मथुरा-वृंदावन येथून आणले जाते. स्नानानंतर भगवानांना ही शाल व कानटोपी परिधान करण्यात येणार आहे.

त्यानंतर स्नानयात्रा कथा, प्रवचन, कीर्तन आणि ५६ भोगांचा महाप्रसाद होईल. भाविकांना पोहे, दही, केळी आणि आंब्याच्या रसापासून तयार केलेला ‘दही-चिडा’ प्रसाद वितरित करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी अमेरिकेहून गोविंद भक्त प्रभू उपस्थित राहणार आहेत.

काय आहे ‘अनवसरण’?
देवस्नान पौर्णिमेला १०८ मंगलकलशांतील पवित्र जल, औषधी द्रव्ये आणि चंदनाने भगवानांचा महास्नान विधी केला जातो. त्यानंतर भगवानांना ज्वर आल्याचे मानून पुढील १५ दिवस ‘अनवसरण’ (विश्रांती) काळ पाळला जातो. या काळात भगवानांना आले-वेलचीचा काढा, दूध-हळद, दलिया, खिचडी आणि फळांचा भोग अर्पण केला जातो.

रथयात्रा २२ जुलैला
अनवसरण काळानंतर २२ जुलै रोजी दुपारी १२ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथून भगवान जगन्नाथांची रथयात्रा निघेल. चार पुतळा, सरस्वती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाळीवेस, मधला मारुती, कन्ना चौक, जोडबसवण्णा चौक मार्गे दाजीपेठ येथील बालाजी मंदिरापर्यंत रथयात्रा पार पडणार आहे.

रविवारीचा कार्यक्रम
सकाळी ७.३० : दर्शन व गुरुपूजा
सकाळी ८.०० : देवस्नान पौर्णिमा (स्नानयात्रा)
सकाळी ८.३० : स्नानयात्रा कथा
सकाळी ९.३० : दही-चिडा महोत्सव, कीर्तन व महाप्रसाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

Cutlet Paratha: एकदा बनवाल तर घरच्यांची फर्माईश ठरलेली! असा बनवा स्वादिष्ट कटलेट पराठा

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

अस्थिबोध : अवघड शस्त्रक्रिया; पण नियोजन अचूक!

SCROLL FOR NEXT