Crime esakal
पुणे

Pune Crime : एकतर्फी प्रेमातून आयटी अभियंता महिलेवर प्राणघातक हल्ला; पोलिसांकडून तरुणाला अटक

एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने आयटी अभियंता महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने आयटी अभियंता महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट परिसरात बुधवारी (ता. १२) घडली.

या प्रकरणी एका ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरून कोरेगाव पार्क पोलिसांनी संकेत शहाजी म्हस्के (वय २६, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही एका आयटी कंपनीत नोकरीस आहे. तर संकेत हा दुसऱ्या एका कंपनीत खासगी नोकरीस आहे. त्यांची काही वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते. दरम्यान, या महिलेचा घटस्फोट झालेला पती पुन्हा तिच्या संपर्कात आला होता.

संकेत म्हस्के याने काही दिवसांपूर्वी या महिलेला ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला आवडते, असे म्हणून जवळ जाण्याचा प्रयत्न केला. परंतु महिलेने ‘मी तुझी फक्त मैत्रीण राहू शकते’, असे सांगितले. फिर्यादी महिला बुधवारी सकाळी बर्निंग घाट परिसरात एका मित्राकडे आली होती.

त्यावेळी रिक्षातून आलेल्या संकेतने तिला अडवले. ‘तू मला का भेटत नाही? माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला खूप आवडतेस, तू माझी होऊ शकत नाही तर कोणाचीही होऊ शकत नाही, असे म्हणत महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात ही महिला खाली पडल्यानंतर तिच्या डोक्यात मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश वराळ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT