It is possible to maintain social distance in the shop through Ding app 
पुणे

काय सांगता? दुकानात सोशल डिस्टनसिंग पाळणे होणार शक्य; डिंग अॅपची कमाल

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाद्वारे सातत्याने सोशल डिस्टनसिंगवर भर देण्यात येत आहे. सध्या लॉकडाऊनला शिथिल करण्यात आले असून रुग्णायल, मॉल, रेशन दुकान यासारख्या सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच सोशल डिस्टनसिंगचा उपयुक्त पर्याय म्हणून पुण्यातील युवकांनी 'डिंग' या ऍपची निर्मिती केली आहे. या ऍपच्या माध्यमातून नागरिकांना डॉक्टर व सलूनसाठी अपॉइंटमेंट तर रेशन खरीदिसाठीची स्वतंत्र वेळ बूक करणे सोपे झाले आहे. विशेष म्हणजे हे ऍप नागरिकांसाठी प्लेस्टोरवर मोफत उपलब्ध आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या ऍपची निर्मिती संतोष पतीदर आणि अक्षय पुरे यांनी केली असून याद्वारे रुग्णालयांपासून ते मॉल सारख्या ठिकाणी नागरिकांसाठी रांग व्यवस्था, पूर्व अपॉइंटमेंट आणि टोकन सिस्टिमची सुविधा देण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना पुरे म्हणाले, "या ऍपच्या माध्यमातून रुग्णांना देखील क्लिनिक अथवा रुग्णालयात तपासणीसाठी तासंतास बसण्याची गरज नाही. ऍपद्वारे त्यांना पूर्व अपॉइंटमेंट आणि एक ठराविक कालावधी दिला जातो, ज्यामुळे त्यांना त्या कालावधीतच येऊन तपासणी करणे शक्य होईल. तसेच डॉक्टरांना देखील अश्या पद्धतीत तपासणी करणे सोपे होईल. इतकच नाही तर रुग्णाला त्याची अपॉइंटमेंट कालावधीची सूचना मोबाईलवर एसएमएस मार्फत देण्यात येते. तसेच आपली अपॉइंटमेंट आहे किंवा आपल्याला या वेळेत वस्तू खरेदी करता येईल यासाठी आठवण म्हणून पुन्हा एकदा एसएमएस पाठवण्यात येते. तत्काळ रुग्णालयात तपासणीसाठी जायचं असेल तर याकरिता 'विशेष स्लॉट बुकिंग' सुविधा देखील देण्यात आली आहे. तपासणीसाठी पूर्व अपॉइंटमेंट घेत असल्याने रुग्णाची प्राथमिक माहिती ऑनलाईन घेतली जाते. तसेच त्यांचे चाचण्या केलेल्या रिपोर्ट्सची माहिती पण ऑनलाईन असल्याने भविष्यात कोणतेही वैद्यकीय कागदपत्र सोबत घेऊन जाण्याची गरज नसते. तर डॉक्टरांकडे देखील रुग्णांचा ई-डाटा उपलब्ध असतो."
 

डिंग ऍप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

"या ऍप मार्फत मद्यपान आणि रेशन दुकानात दररोज सुमारे एक हजाराहून अधिक लोकांना टोकन देण्यात येत आहे. तसेच कोणाला दिलेल्या अपॉइंटमेंट वेळेत बदल करणे शक्य आहे. तसेच हे ऍप नागरिकांसाठी मोफत उपलब्ध आहे."
- अक्षय पुरे, संस्थापक - डिंग ऍप

ऍपचे महत्त्व
- रुग्णालय आणि क्लिनिक मध्ये विशेष वेळ ठरवून जाण्यास उपयोग
- मॉल, दूध आणि किराणा दुकानासाठी टोकन व्यवस्था
- रांगेत थांबण्याची गरज नाही व देण्यात आलेल्या वेळेत करा खरेदी
- सोशल डिस्टनसिंगचे प्रत्येक्षात पालन
- विविध भाषांमध्ये ऍप वापरले जाऊ शकते
- लाईव्ह ट्रॅकिंग सुविधा


- व्यसनेही झाली अनलॉक; लॉकडाउनमुळे थांबलेली तलफ पुन्हा वाढली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूर जिल्ह्यातील वास्तव! २०२५ मध्ये ३४२ अल्पवयीन मुलींचे अपहरण अन्‌ १८५४ महिला-तरुणी बेपत्ता; ४० अल्पवयीन मुली अन्‌ २८५ महिला सापडल्याच नाहीत

Adolescent Mental Health : पौगंडावस्थेतील मानसिक आरोग्य; मुलांच्या मनातील गोंधळ आणि पालकांची जबाबदारी

मोठी बातमी! १५००० घेऊनही सोलापूरमधील अर्धा लाख लाभार्थींनी घरकुलांचे बांधकाम सुरुच केले नाही; राज्य सरकारचे ५० हजार मिळेनात, २७०० जणांना घरासाठी नाही जागा

Morning Breakfast Recipe: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि टेस्टी! झटपट बनवा टेस्टी पालक पराठा, रेसिपी आहे अगदी सोपी

Panchang 28 January 2026: आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT